मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. ‘वाळवी’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनीच ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे आणि बालकलाकार मायका वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सगळे कलाकार आणि या चित्रपटाचे सहा निर्माते जोरदार प्रमोशन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, या सगळ्यात अभिनेत्री मुक्ता बर्वे कुठे आहे असा प्रश्न चाहत्यांना एवढे दिवस पडला होता. अखेर पोस्ट शेअर करत मुक्ताने याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?”, आदेश बांदेकरांच्या लेकाला नेटकऱ्याचा प्रश्न, सोहम म्हणाला…

मुक्ता बर्वेची पोस्ट

तुम्हाला माहित आहे… मी आता भारतात नाहीये… कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल की, माझ्या फिल्मच्या रिलीजला मी नाही. त्यामुळे ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित झाल्यापासून मला ना एक अस्वस्थ feeling येतंय…

ते म्हणजे १ मे ला film तर release झाली… आणि आम्ही कलाकृती यासाठीच बनवतो की, ती प्रेक्षकांनी बघावी… आणि भरभरून प्रेम द्यावं… आणि… प्रेक्षक सिनेमा बघून कौतुकाने आम्हाला डोक्यावर घेतही आहेत… पण हे सर्व मी film बघण्या आधीच होतंय..! चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे… प्रेक्षक appreciate करत आहेत, पण मी अजून film पाहिलीच नाहीये… आणि मला त्याची रुख रुख वाटते आहे. पण हरकत नाही… माझ्या नाटकावर माझं प्रेम आहे… तिही माझी commitment आहे आणि मी इकडे माझ्या @charchaughi नाटकाचे दौरे अगदी उत्साहाने करते आहे… पण मनाने कुठेतरी मी भारतातही आहे माझ्या team बरोबर… माझ्या प्रेक्षकांबरोबर… माझ्या मराठी माणसांबरोबर..!

त्यामुळे आता मी खूप आतुर आहे की, कधी मला माझीच film (म्हणजे आपली film) चित्रपटगृहात जाऊन तुम्हा सर्वांबरोबर बघता येईल..! इथले सर्व प्रयोग यशस्वीरित्या पार पाडून मी लवकरच भारतात येतेय… जी काही कमी राहिली आहे माझ्या अनुपस्थितीमुळे… ती मी भरून काढणार आहे..! १२ मेपासून आहेच तुमच्याबरोबर… भेटूया आणि मज्जा करूया…तोपर्यंत थेटरात ‘घुमोत्सव’ असाच उत्साहात साजरा होत राहू दे..!

‘नाच गं घुमा’ तुमच्या भेटीला १ मे पासून आलेला आहे आणि तो तुम्ही पहिला असेल…पण, ज्यांनी नाही पाहिला…त्यांनी पहिलं तिकिट काढा आणि तुमच्या प्रतिक्रिया comments, reels, stories द्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

हेही वाचा : “लग्नाआधी ३ वर्षे एकत्र राहिलो”, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल म्हणाले, “आई बाबांनी…”

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने पहिल्या ५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर एकूण ७.८० कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटावर सध्या सगळेजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच मुक्ताच्या चाहत्यांच्या मनात ती कधी एकदा भारतात येतेय याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukta barve shared special post for naach ga ghuma movie sva 00