Premium

रुपाली चाकणकरांच्या लेकाच्या पहिल्या मराठी चित्रपटातील गाणं प्रदर्शित, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

‘विरजण’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित, रुपाली चाकणकरांच्या लेकाची व्हिडीओत दिसली झलक

rupali-chakankar-son-marathi-movie
'विरजण' चित्रपटातील गाणं प्रदर्शित. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादीच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सोहमने राजकारणात नशीब न आजमावता अभिनयाची वाट धरली. सोहम ‘विरजण’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो रोमँटिक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोहम चाकणकरच्या विरजण या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. विरजण या मराठी चित्रपटातील “देवा सांग ना” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेंनी हे गाणं गायलं आहे.

हेही वाचा>> “आज माझी वेळ आहे, उद्या…”, कुस्तीपटू व पोलिसांमधील झटापटीनंतर विजेंदर सिंगचं ट्वीट, बॉलिवूड अभिनेता म्हणाला, “एकदम…”

लेकाच्या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा व्हिडीओ रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “आज सोहमच्या ‘विरजण’ या चित्रपटातील “देवा सांग ना” हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे,” असं चाकणकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत सोहमला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> प्रसूतीनंतर दीपिका कक्कर अभिनयाला करणार रामराम, कारण…

“देवा सांग ना” गाण्यापू्र्वी ‘विरजण’ चित्रपटातील ‘माझी आई तू’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. सोहम चाकणकर मुख्य भूमिकेत असलेला विरजण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 17:57 IST
Next Story
“तुमच्या व्हिडीओने वेळ वाया घालवला…,’ नेटकऱ्याच्या कमेंटला क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली…