मराठी चित्रपटातील विनोदांचा सम्राट अशी ओळख कमावलेला अभिनेता म्हणजे अशोक सराफ. सराफ यांचा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहतावर्ग आहे. कित्येक वर्षांपासून अशोक सराफ छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहेत. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, अशोक सराफ एका वेगळ्याच कारणान चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मराठी कलाकाराला दिलेल्या वागणुकीवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “१८ वर्षांचं प्रेम अन्…”, ऑस्ट्रेलियात प्रिया बापट-उमेश कामतचा रोमँटिक अंदाज, लिपलॉक करतानाचा फोटो चर्चेत

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भाऊ कदमने नुकतीच अशोक सराफ यांची भेट घेतली. अशोक सराफ यांना बघून भाऊ त्यांच्या पाया पडला. अशोक सराफांनी पण त्याची आपुलकीने चौकशी केली. भाऊने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी भाऊ कदमला दिलेल्या वागणूकीवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

भाऊने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत अशोक सराफांवर नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत अशोक सराफांवर निशाणा साधला आहे. त्याने कमेंट करत लिहिलं “अशोक सराफ ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांनी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचा आदर कसा करावा हे अगोदर शिकले पाहिजे”. तर दुसऱ्याने “बघूनच माणुसकी समजली कदम दादांना साधे बसा पण नाहि म्हटले आपलेपणाचा नुसता दिखावा करता का?” अशी कमेंट करत अशोक सराफांना ट्रोल केलं आहे. आणखी एकाने “पायणटाचा मुद्दा म्हणजे ये भाऊ बस, काय घेणार चहा कॉफी कि… ते? हॆ विचारलं नाही” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी “आलेल्या पाहुण्यांना बसायला सुद्धा सांगायची पद्धत नाही का ?” असा प्रश्न विचारला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens troll ashok saraf for the treatment given to the marathi actor video viral dpj