Rinku Rajguru Talk’s About Her Relationship Status : अभिनेत्री रिंकू राजगुरु मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने विविध चित्रपटांमध्ये काम करत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अशातच तिला एका चाहत्याने ती सिंगल आहे की रिलेशनशिपमध्ये याबाबत विचारलं आहे.

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. यासह ती तिच्या कामाच्या अपडेटदेखील यामार्फत चाहत्यांसह शेअर करत असते. अशातच तिने नुकतंच ‘आस्क मी’ हे सेशन घेतलं होतं. यावर अनेकांनी तिला विविध प्रश्न विचारले. रिंकूने त्या सर्वांची उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु, यादरम्यान तिला एका चाहत्याने चक्क तू सिंगल आहेस का असा प्रश्न विचारला.

रिंकूने चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत ती रिलेशनशिपमध्ये आहे की नाही याबाबत सांगितलं आहे. रिंकूने सोशल मीडियावर याचं उत्तर देत हो असं म्हटलं आहे. यामार्फत तिने ती कोणालाही डेट करत नसून सिंगल असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यासह एका चाहत्याने यादरम्यानच तिला “तुझा प्रेमावर विश्वास आहे का?”, असा प्रश्न विचारला होता. यावर तिने हो असं म्हटलं आहे. त्यामुळे ती सध्या सिंगल जरी असली तरी तिचा प्रेमावर विश्वास असल्याचं तिने यातून म्हटलं आहे. रिंकूने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामुळे ती डेटवर गेली आहे अशा चर्चा सुरू होत्या; परंतु तिने ती कोणाहीबरोबर डेटवर गेली नसून सोलो डेटला गेल्याचं म्हटलं आहे.

रिंकू राजगुरुची इन्स्टाग्राम स्टोरी

रिंकूने यामधून तिच्या काही आवडत्या गोष्टींबद्दलही सांगितलं आहे. या सेशनमधून तिने तिचा आवडता चित्रपट, पदार्थ, आगामी चित्रपट याबद्दल सांगितलं आहे. रिंकूने यामधून ‘पिंजरा’ हा तिचा आवडता चित्रपट असल्याचं सांगितलं आहे. यासह तिला मोदक हा पदार्थही खूप आवडतो. तर ती लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिंकू लवकरच ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातून झळकणार आहे. यामधून ती अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सुबोध भावे यांच्यासह महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. २२ ऑगस्टला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.