रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख सध्या त्यांच्या आगामी ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. रितेशने या चित्रपटाच्यानिमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने रितेश-जिनिलीयाने ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या डिजिटल अड्डाला हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Tunisha Sharma Suicide : धर्म आणि वय नाही तर ‘या’ कारणामुळे केलं तुनिषाशी ब्रेकअप, शिझानचा पोलिसांसमोर खुलासा

यावेळी रितेश-जिनिलीयाने त्यांच्या चित्रपटाबाबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्याचबरोबरीने या मुलाखतीदरम्यान रितेशला एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही आता दिग्दर्शनामध्ये पदार्पण केलं आहे. तर वडील विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा विचार तुम्ही कधी केला आहात का?

यावर रितेश उत्तर देत म्हणाला. “बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे. ग्रामपंचायतीत सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री ही आपण एखाद्या व्यक्तीची कारकिर्द पाहतो. त्या व्यक्तीचा हा जीवनप्रवास खूप मोठा असतो. ४० वर्ष ते राजकीय क्षेत्रात होते. हा संपूर्ण प्रवास दोन तासांमध्ये दाखवायचा आहे. यामध्ये तुम्ही काय दाखवणार? कुठली गोष्ट दाखवणार? हाही प्रश्न आहे.”

“माझ्या वडिलांवर चित्रपट करणारच आहे असं काही ठाम नाही किंवा कधीच करणार नाही असंही नाही. तो योग व ती वेळ अजून आली नाही असं मला वाटतं. भविष्यात जर काही यावर काम करता आलं तर पुढे काय घडेल हे आताच सांगता येत नाही.” रितेश विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार का? हे येणार काळच सांगू शकेल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh on vilasrao deshmukh movie says may be my in future i am working for father biopic watch video kmd