मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर सईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअऱ करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. दरम्यान, एका मुलाखतीत तिने तिच्या जोडीदाराबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सईने नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिला नेमका कसा जोडीदार हवा आहे याबाबत खुलासा केला आहे. सई म्हणाली, मला असा जोडीदार हवा आहे, ज्याच्याबरोबर मी काहीही बोलू शकते. अनेकदा मुलं मुली आपल्या जोडीदारासमोर वेगळं वागतात आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींसमोर वेगळं वागतात हे मला नाही आवडत. मला माझ्या जोडीदाराचे व्यक्तिमत्व शोधूनसुद्धा उरतं ना तशा प्रकारचं हवं आहे. ज्याच्याबरोबर वयाची ६० वर्ष जरी जगलो तरी त्याचे नवीन नवीन गुण समोर आले पाहिजेत.

सई पुढे म्हणाली, “नात्यामध्ये दोघांच्या स्पेसलाही तेवढेच महत्व दिले गेले पाहिजे. स्पेसमुळे तुमच्या आयुष्यात एक उत्सुकता, ओढ कायम जिवंत राहते. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येण्याअगोदर माझे एक वेगळे जग होते, ते जग तसेच कायम राहिले पाहिजे. तसेच त्याचेही जग कायम राहिले पाहिजे.”

सईने २०१३ मध्ये अमेय गोसावीबरोबर लग्नगाठ बांधली. अमेय हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे. लोडिंग पिक्चर्स नावाची त्याची निर्मिती संस्था आहे. लग्न करण्याअगोदर सई व अमेय तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. २०१२ मध्ये दोघांनी गुपचूप साखरपुडाही केला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, दोघांचे हे नाते जास्त काळ टिकले नाही. लग्नाच्या दोन वर्षातच म्हणजे २०१५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. सईने आपल्या खांद्यावर कोरलेल्या टॅटूमध्ये दोन तारखा आहेत. त्यातील एक तारीख म्हणजे तिच्या लग्नाची, तर दुसरी तारीख अमेयने प्रपोज केलेल्या दिवसाची आहे.

हेही वाचा- सिद्धार्थ-मितालीच्या अफेअरबाबत कळताच ‘अशी’ होती सई ताम्हणकरची प्रतिक्रिया; म्हणाली, “दोघांचा एकत्र फोटो बघितला अन्…”

सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीबरोबर बॉलीवूडमध्येही सईने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे, येत्या २ फ्रेबुवारीला तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भूमिका आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar talks about qualities of future husband in recent interview dpj