मराठी मनोरंजन विश्वात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटानंतर श्री शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवलेली प्रशासकीय जबाबदारी आणि कोंढाण्याच्या लढाईचा इतिहास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटासंदर्भातील अनेक खुलासे दिग्दर्शकाने ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहेत.

हेही वाचा : गायक अरमान मलिकने गुपचूप उरकला साखरपुडा! २ वर्षांनी मोठ्या असलेल्या आशना श्रॉफशी बांधणार लग्नगाठ

दिग्पाल लांजेकर म्हणाले, “‘सुभेदार’ चित्रपटासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत होतो याचवेळी रिसर्च करताना अनेक गोष्टी आमच्या समोर आल्या. मालुसरेंच्या घरी होणाऱ्या प्रत्येक लग्नकार्यात पीठाचे ३६० दिवे लावतात आणि त्यानंतर हे दिवे ओल्या धोतराने फटका मारुन विझवले जातात. असा एक संपूर्ण विधी त्यांच्यात आहे.”

हेही वाचा : फोटोतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये साकारते महत्त्वाच्या भूमिका

दिग्पाल लांजेकर पुढे म्हणाले, “या विधीबाबत जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा मला कळालं की, हे दिवे म्हणजे सिंहगडाच्या युद्धाचं प्रतीक आहे. ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी सिंहगडाच्या युद्धात बलिदान दिलं, त्यांचं प्रतीक म्हणून मालुसरेंच्या घरात तेव्हापासून हे दिवे लावले जातात. त्यांच्या घरातील प्रत्येक मंगलकार्यात ३६० दिवे लावून वीरांचं स्मरण केलं जातं.”

हेही वाचा : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सई ताम्हणकरचं क्रिती सेनॉनबरोबर खास सेलिब्रेशन, म्हणाली, “माझी…”

दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५.०६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ०२.२२ कोटींचा गल्ला जमावत दमदार कामगिरी केली आहे. चिन्मय मांडलकेर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांनी ‘सुभेदार’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.