Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा लाडका दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. १४ फेब्रुवारीला प्रथमेशचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्व चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता होती. अखेर प्रथमेश लग्नबंधनात अडकला आहे. क्षितीजा घोसाळकरशी आज प्रथमेशने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

अभिनेता प्रथमेश परबने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले.” या लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही फार सुंदर दिसत असून खूप आनंदात पाहायला मिळत आहे. लग्नासाठी दोघांनी खास पारंपरिक लूक केला होता.

हेही वाचा – ’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीने दाखवली लेकाची पहिली झलक, जाहीर केलं नाव

लग्नात क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता आणि बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी त्याने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. याशिवाय प्रथमेशने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता.

हेही वाचा – Pooja Bhatt: वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट

प्रथमेशच्या या लग्नाच्या पोस्टवर आता कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सायली संजीव, रवी जाधव यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, प्रथमेश-क्षितीजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितीजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.

प्रथमेशची बायको कोण आहे?

प्रथमेशची बायको क्षितीजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितीजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितीजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.