ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलै रोजी निधन झालं. पुणे जिल्ह्यातील आंबी गावात बंद फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं, त्यानंतर त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांचा मुलगा गश्मीर तिथे पोहोचला. त्याच दिवशी सायंकाळी त्यांच्यावर पुण्यातील नवी पेठेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब

रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जातात, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे असंख्य चाहते आहेत. रवींद्र यांचं चौकोनी कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी माधवी, मुलगा गश्मीर व मुलगी रश्मी आहेत. त्यांच्या मुलाबद्दल सर्वांनाच माहीत आहे, तो प्रसिद्ध अभिनेता आहे, पण त्यांची मुलगी अभिनयसृष्टीच्या झगमगाटापासून दूर आहे.

गश्मीरची बहीण रश्मी विवाहीत आहे. ती गश्मीरपेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. तीन वर्षांपूर्वी रक्षा बंधनाच्या दिवशी गश्मीरने बहिणीसाठी केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. “माझी बहीण, माझ्याहून १३ वर्षांनी मोठी. माझी छोटी आईच ती! K.G. पासून ते पाचवी पर्यंत – माझा डब्बा भरणे, मला शाळेसाठी तयार करणे, मला तिच्या कायनेटिक होंडा वरुन शाळेत सोडणे – तिनेच केले. हिरो होण्याकरता मला सिनेसृष्टीत येण्याची गरज नव्हती. जन्मापासूनच मी तिचा स्टार होतो. माझ्या चित्रपटांना यश मिळो वा न मिळो, माझी एक फॅन निश्चितच माझ्या पाठीशी कायम उभी असेल कारण तिचं प्रेम आणि तिची निष्ठा परिस्थितीनुसार बदलत नाही. म्हणूनच नैराश्य माझ्या आसपासही भटकत नाही. स्वामी म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” .. अर्थात, ते कुणाच्या रुपाने माझ्या पाठीशी उभे आहेत हे तुम्हाला समजलेच असेल,” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, गश्मीरचेही लग्न झाले आहे. त्याच्या पत्नीचे नाव गौरी देशमुख आहे, त्यांना एक मुलगाही आहे. गश्मीर पत्नी, मुलगा व आईबरोबर मुंबईत राहतो, तर रवींद्र महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून आंबी गावात राहत होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is ravindra mahajani daughter rashmi photos viral shared by gashmeer mahajani hrc