मराठी चित्रपटसृष्टीतील वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडलकर ओळखले जातात. त्यांनी नाटक, शॉर्ट फिल्म, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम माध्यमांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आपल्या चित्रपटातून ते कायमच वेगळे विषय हाताळत असतात. ‘रेस्टॉरंट’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘गुलाबजाम’, या चित्रपटांमधून त्यांनी वैविध्य जपले आहे. सोशल मीडियावर ते कायम सक्रिय असतात. आपण वाचत असलेली पुस्तके ते कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकताच त्यांचा ‘पॉंडिचेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आला होता.

सचिन कुंडलकर यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कॅमेरामन अमलेंदू चौधरी आणि स्वतः सचिन कुंडलकर दिसत आहे. या फोटोवर त्यांनी कॅप्शन दिला आहे, प्रत्येक पिढीमध्ये एक स्मिता जन्माला येते. अपरिमित कष्ट आणि कॅमेऱ्याला समजणारा चेहरा . सोनाली गंधच्या सेटवरती. हुशार आणि काळासोबत प्रवाही असणारी मुलगीसोबत अमलेंदू चौधरी . चेहरा वाचू शकणारा माझा मित्र . कॅमेरामन . असा कॅप्शन त्यांनी दिला आहे.

रवी जाधव लवकरच करणार ‘ओटीटी’ विश्वात पदार्पण, फोटो शेअर करत म्हणाले…

सचिन कुंडलकर यांच्या ‘गंध’, ‘गुलाबजाम’ या चित्रपटात तिने काम केलं आहे. अमलेंदू चौधरी यांनी सचिन कुंडलकर यांच्या ‘अय्या’ या हिंदी चित्रपटात चित्रित केला आहे. सचिन कुंडलकर यांनी आजच्या आघाडीच्या अभिनेत्री प्रिया बापट, सई ताम्हणकर यांच्याबरोबर काम केलं आहे. ‘नाईन्टीन नाईन’ ही कादंबरी त्यांनी लिहली आहे.

सचिन मूळचे पुण्याचे आहेत. लहानपणापासून चित्रपटाचाही आवड असल्याने साहजिकच त्यांनी आपले करियर या क्षेत्रात करण्याचे ठरवले. पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत (एफ.टी.आय.आय. संस्थेत) त्यांनी चित्रपटविषयक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतले . महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात शिकत असताना त्यांनी ‘दोघी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे, सुनील सुखटणकर यांच्याकडे साहाय्यकाचे काम केले होते.