मॉडेल अपर्णाने मे महिन्यात अभिनेता जॅकी भगनानी, फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन आणि इतर सात जणांविरूद्ध बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप केला होता. त्यावेळी तिने वांद्रे पोलिस स्टेशमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अपर्णाने चित्रपटसृष्टीतील ९ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. अपर्णाने २६ मे रोजी ही तक्रार दाखल केली होती. आता अपर्णाने दावा केला आहे की तिला मृत्युच्या धमकी देत आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अपर्णाने हा दावा केला आहे.

अपर्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “हे हाय प्रोफाइल लोक मला अजूनही दुसऱ्यांच्या मार्फत जिवे मारण्याची धमकी देत आहेत. ते बरेच हिंसक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मला धमकी देत आहेत. मी अशा अनेक अकाऊंट्सना ब्लॉक केले आणि काही अकाऊंटला रिपोर्ट केले आहे. ज्यांचे अकाऊंट मी रिपोर्ट केले त्यांनी नावं थोडी वेगळीच होती. त्यासोबतच त्यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ त्रासदायक आहेत. या सगळ्या गोष्टी टाइप करताना देखील माझे हात थरथरत आहेत. या विषयी मी पोलिसांना माहिती दिली आहे, परंतु त्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि तक्रार दाखल करून घेतली. परंतु आता माझ्यात एवढी क्षमता नाही. मला आठवण आहे की या लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मला ३ आठवडे लागले होते,” असे अपर्णा म्हणाली.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

पुढे अपर्णा म्हणाली, “म्हणून मला सगळ्यांना सांगायचे आहे की, शेवटचा निर्णय येण्याआधी आणि नंतर माझ्यासोबत काही झालं तर मी ज्या लोकांचे आता नाव सांगत आहे म्हणजेच गुरप्रीतसिंग, शील गुप्ता, कामत निखिल, गुरजोतसिंग, अजित ठाकूर, कृष्णा कुमार, विष्णू इंदुरी, मोरनिस कोलस्टन ज्युलियन, सुहेल सेठ, जॅकी भगनानी आणि अनिर्बन हे यासाठी पूर्णपणे जबाबदार असतील. यांच्या शिवाय या जगात माझे दुसरे कोणी शत्रू नाही.”

आणखी वाचा : घटस्फोटानंतर आमिर आणि किरण रावने लडाखमध्ये केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल

इतकेच नाही तर अपर्णान कोल्स्टन ज्युलियनवर अनेक मोठे आरोप केले होते. फोटोग्राफर ज्युलियन कोल्स्टन आणि सुहेल सेठ यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अपर्णाने केले आहेत.