“बिग बॉसमुळे माझे आयुष्य खराब झाले”, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

तिने ‘बिग बॉस’ आणि ‘कुमकुम भाग्य’च्या निर्मात्यांवर तिचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या हिंदी बिग बॉसचे १४ वे पर्व सुरु आहे. अभिनेत्री नैना सिंह हिने वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एंट्री केली. मात्र अवघ्या दोन आठवड्यात तिचे एलिमिनेशन झाले. त्यानंतर ती बिग बॉसमधून बाहेर पडली. यानंतर अभिनेत्री नैना सिंहने बिग बॉससह कुमकुम भाग्यच्या निर्मात्यांवरही तिचे करिअर नष्ट केल्याचा आरोप केला आहे.

नैना सिंह हिने नुकतंच ई टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेसृष्टीतील वाईट आठवणी आणि करोना काळाबद्दल सांगितले. या मुलाखतीत तिने ‘बिग बॉस’ आणि ‘कुमकुम भाग्य’च्या निर्मात्यांवर तिचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.

यावेळी नैना म्हणाली की, “बिग बॉस १४ केल्यानंतर माझे आयुष्य खराब झाले. कुमकुम भाग्य मालिका सोडल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. पण ‘बिग बॉस’ केल्याचा मला पश्चाताप होतो. त्यावेळी ‘बिग बॉस’मध्ये असल्यामुळे आम्हाला हे नको आहे, असे अनेकजण सांगत होते. बिग बॉसनंतर तर या गोष्टी आणखी बिघडत गेल्या. मी माझ्या आयुष्यात कधीही ‘बिग बॉस’ पाहिले नव्हते. मी हा शो तेव्हाच पाहिला जेव्हा सिद्धार्थ शुक्ला त्यात होता. मी त्याची चाहती आहे.”

“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

“करोना सुरु आहे या विचाराने मी ‘बिग बॉस’ची ऑफर स्विकारली होती. पण त्यावेळी माझी वाईल्ड कार्ड एंट्री होईल असे मला सांगण्यात आले नव्हते. मला ३ आठवडे हॉटेलमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. माझा वेळ तिथे वाया गेला. बिग बॉसच्या घरापेक्षा मी जास्त दिवस क्वारंटाईनमध्ये घालवले,” असेही ती म्हणाली.

“एकदा तर अशी वेळ आली की जेव्हा मी निर्मात्यांना सांगितले की मला हा शो करायचा नाही. कारण करारात असे काहीही नमूद नाही. त्यामुळे तुम्ही मला अशाप्रकारे हॉटेलमध्ये बसवू शकत नाही जिथे मी काहीही करत नाही. त्यामुळे आता जर मला पुन्हा ‘बिग बॉस’ची ऑफर मिळाली तर मी तो करणार नाही. कारण त्यांना काय हवे आहे, हे मला माहित आहे,” असेही तिने यावेळी म्हटले.

“मी काम मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण माझे काम कुठेही होत नाही. जेव्हा मी ‘कुमकुम भाग्य’ मालिका सोडली तेव्हा निर्मात्यांनी मला करियर संपवण्याची धमकी दिली. मला काम मिळू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पण मी आता गप्प बसणार नाही. आधी मला वाटत होते की कोणाच्याही कारकिर्दीत कोणीही काही करू शकणार नाही. कारण सर्व ऑडिशन्स त्या कलाकाराला द्याव्या लागतात.” असेही तिने सांगितले.

‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेनने ठेवल्या होत्या ‘या’ अटी, निर्मात्यांनी दिला होता स्पष्ट नकार

“पण माझ्या बाबतीत हे सर्व उलट घडले. नैनाच्या म्हणण्यानुसार, मला तीन वेब सीरिजमधील अनेक सीन्समधून वगळण्यात आले. मी खूप प्रयत्न करत आहे, पण त्या पातळीवर कोणीतरी आहे जो मला बाहेर काढतो,” असे नैनाने म्हटले.

‘यंदाच्या निवडणुकीतही ते विजयी होतील’, ‘या’ अभिनेत्याच्या आईने पंतप्रधान मोदींना दिला आशीर्वाद

नैना सिंह ही राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियन आहे. तिने २०१३ मध्ये ‘फेमिना मिस स्टायलिश दिवा’चा किताब जिंकला आहे. त्यानंतर २०१७ मध्ये ती ‘स्प्लिट्सविला 10’ ची विजेती ठरली होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर ती ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘बिग बॉस’मध्येही झळकली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naina singh accuses kumkum bhagya and bigg boss makers of sabotaging her career nrp

Next Story
5G प्रकरणी अभिनेत्री जुही चावलाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी