scorecardresearch

‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेनने ठेवल्या होत्या ‘या’ अटी, निर्मात्यांनी दिला होता स्पष्ट नकार

या मागण्या नेमक्या काय होत्या? याची माहिती समोर आली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबिता, पोपटलाल, डॉ. हाती ही सर्व पात्र कायमच चर्चेत असतात. पण या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. ती पुन्हा मालिकेत कधी दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिने मालिकेत पुन:पदार्पण करण्यासाठी निर्मांत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. पण त्या मान्य न झाल्याने तिने या मालिकेत काम करण्यासाठी नकार दिला आहे. या मागण्या नेमक्या काय होत्या? याची माहिती समोर आली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका करणाऱ्या दिशा वकानीने २०१७ मध्ये शोमधून ब्रेक घेतला होता. त्यावेळी ती प्रसूतीच्या सुट्टीवर गेली होती. त्यामुळे ६ महिन्यांनी ती परत येईल, असे निर्मात्यांना वाटत होते. पण तसे झाले नाही. दिशा आणि निर्मात्यांच्या पुनरागमनाबद्दल चर्चा सुरु होत्या. पण त्या चर्चा फोल ठरल्या. विशेष म्हणजे दिशाचे पती यांनीही ती शोमध्ये परत येणार नसल्याचे अधिकृत विधान केले होते.

दरम्यान तिने मालिकेत पुन:पदार्पण करण्यासाठी निर्मांत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. कोईमोई या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा वकानीने तिच्या फीमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. दिशाने या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी 1.5 लाख रुपयाची मागणी केली होती. यावेळी दिशाच्या वतीने तिचा पती संवाद साधत होता. त्यासोबतच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या टीमला असेही सांगितले की, दिशा ही दिवसभरात फक्त ३ तास काम करेल.

“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

विशेष म्हणजे दिशाच्या पतीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर त्यांच्या नवजात बाळाला सांभाळण्यासाठी एक खाजगी नर्सरी असावी. तसेच त्यांच्या मुलीला सांभाळण्यासाठी एक वैयक्तिक आया ठेवा, जी संपूर्ण वेळ त्याच्यासोबत असेल, अशीही अट त्यांनी ठेवली होती. दरम्याने दिशाने ठेवलेल्या या अटी मान्य करणे निर्मात्यांसाठी अशक्य होते. त्यांनी या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे दयाबेन ही मालिकेत पुन्हा परतली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The producers had refused the terms set by dayaben disha vakani to return taarak mehta ka ooltah chashmah serial nrp

ताज्या बातम्या