हरहुन्नरी बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचे वडील नवाबुद्दीन सिद्दीकी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी मेंदुच्या पक्षाघाताने निधन झाले. प्रदीर्घ काळापासून ते पक्षाघाताने त्रस्त होते. सहारणपूर येथे काल त्यांचे निधन झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले असता, मृत घोषित करण्यात आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. नवाबुद्दीन ईद साजरी करण्यासाठी बुधाना या आपल्या जन्मगावी मुंबईहून आले होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी नवाझुद्दीन आपल्या गावी जाणार आसल्याचे समजते

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiquis father dies at