अभिनेत्री निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. निया सतत तिच्या फॅशन आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी एका सह कलाकाराने चित्रीकरणा दरम्यान सगळ्या लोकांसमोर तिला प्रपोज केल्याने निया चर्चेत आली आहे.
निया आणि कमल कुमार हे त्यांच्या एका नवीन म्युझिक व्हिडीओचं चित्रीकरण करत होते. त्यावेळी अचानक कमल कुमारने नियाला प्रपोज केले. नियाला कळलेच नाही की काय बोलू. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत कमलने या घटने विषयी सांगितले. “आम्ही शॉटची वाट पाहत होतो, प्रत्येकजण स्वत:च्या कामातं होतं. जेव्हा मी नियाला प्रपोज केलं. निया आणि मी दोघेही हसलो तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ही मस्ती होती. निया खूप सुंदर आहे, प्रत्येकाला तिला प्रपोज करायचं असेल. हे सगळं आम्ही संपूर्ण क्रुच्या मनोरंजनासाठी केलं होतं,” असे कमल म्हणाला.
आणखी वाचा : अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम
आणखी वाचा : ‘केआरके कुत्ता है’ गाण्यावरुन वाद, कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी
खऱ्या आयुष्यात नियाचं नाव हे अभिनेता राहुल सुधिरसोबत जोडले जाते. राहुल गेल्यावर्षी नियाच्या भावाच्या वाढदिवसाच्या पार्टित उपस्थित होता. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत असे ते नेहमीच सांगतात. मात्र, त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे की त्या दोघांनी रिलेशनशिपमध्ये यावे.