सध्या देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. तर काही सेलिब्रिटी सामान्यांप्रमाणेच घरी राहणं पसंत करत आहेत. यामध्येच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यादेखील घरीच आहेत. विशेष म्हणजे नुसरत जहाँ घरी राहून खास पद्धतीने त्यांचा वेळ व्यतीत करत आहेत. सध्या सुट्टीवर असलेल्या नुसरत या घरी राहून नेमकं काय करतायेत हे सांगणारा एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असणाऱ्या नुसरत जहाँ यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्या बिर्याणी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नुसरत जहाँ घरी असल्यामुळे त्या त्यांचा सगळा वेळ कुटुंबीयासाठी देत असल्याचं या व्हिडीओवरुन लक्षात येत आहे.
दरम्यान, करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच गर्दीची ठिकाणंदेखील बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या सगळ्याला नागरिकाही तितकाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आदेशाचं पालन करत आहे. यात नुसरत जहाँ यांचादेखील समावेश आहे. त्यादेखील घरीच आहेत. नुसरत जहाँ या तृणमुल काँग्रेसच्या खासदार असण्यासोबतच लोकप्रिय अभिनेत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांचा फॅन फॉलोअर्सदेखील अफाट असल्याचं पाहायला मिळतं. सध्या इन्स्टाग्रामवर त्यांचे २ मिलिअन फॉलोअर्स आहेत.