तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. गरोदर असल्यापासूनच नुसरत जहाँ चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. नुसरत पती निखिल जैनपासून विभक्त झाल्या आहेत. शिवाय निखिल जैन यांनी देखील बाळ त्यांचं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बाळ कुणाचं अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. शिवाय नुसरत जहाँ यांनी देखील बाळाच्या वडिलांचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यानंतर नुकताच नुसरत यांनी एक फोटो शेअर करत बाळाच्या वडिलांचा नाव न घेता उल्लेख केलाय. मात्र यामुळे आता त्या ट्रोल होत आहेत.
नुसरत जहाँ यांनी मुलाचं नाव ईशान ठेवलं आहे. नुसरत जहाँ आपल्या मुलाचं सिंगल मदर बनून सांभाळ करणार अशा चर्चा सुरु होत्या मात्र यावर आता नुसरत जहाँ यांनी मौनं सोडलं आहे. नुसरत जहाँ यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत त्या आई झाल्यानंतरही खूप सुंदर दिसत आहेत. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिलंय. मात्र या फोटोला त्यांनी दिलेल्या पिक्चर क्रेडिटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पिक्चर क्रेडिटमध्ये नुसरत यांनी ‘डॅडी’ असं लिहलं आहे. म्हणजेच बाळाच्या वडिलांनी हा फोटो काढल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
हे देखील वाचा: सिद्धार्थ शुक्लाला डॉक्टरांनी ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं मात्र…
तर कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, “ज्यांच्याकडून तुम्हा सल्ला घेत नाही त्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका” तसंच पुढे हॅशटॅगमध्ये त्यांनी “न्यू मॉम, न्यू लूक” असं म्हटंलं आहे. असं असलं तरी या फोटोवर नेटकऱ्यांनी नुसरत जहाँ यांना ट्रोल केलंय.
या फोटोवर कमेंट करत अनेकांनी बाळाच्या वडिलांचं नाव जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केलीय. एक युजर म्हणाला, “बाळाच्या डैडीचं नाव काय ते तर सांगा” तर दुसरा म्हणाला, “तुमचा डॅडी की बाळाचा” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “डॅडी म्हणजे ??? निखल जैनने तर काढला नसणार म्हणजे नक्कीच यशदास गुप्ताने फोटो काढला असेल” अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
तर एक युजर नुसरत जहाँ यांच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, “हिंमत असेल तर वडिलांचं नाव सांग” अनेक नेटकऱ्यांनी बाळाच्या वडिलांच्या नावावरून नुसरत जहाँ यांच्यावर निशाणा साधला आहे.
नुसरत जहाँ आणि अभिनेचा यशदास गुप्ता यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा असून बाळाच्या जन्मावेळी यशदास गुप्ता रुग्णालयात उपस्थित होते. तर नुसरत जहाँ घरी परतत असताना यशदास गुप्ता यांना बाळासोबत स्पॉट करण्यात आलं होतं.