अॅमेझॉन-एमएक्स प्लेअरवरील ‘बॅटलग्राउंड’ नावाचा शो सध्या खूप चर्चेत आहे. कारण आहे असिम रियाज ( Asim Riaz ). या शोमध्ये असिमची रुबीना दिलैक आणि अभिषेक मल्हानबरोबर कडाक्याचे वाद झाले. त्यामुळे असिम वादाच्या भोवऱ्यात पुन्हा अडकला असून या वादामुळेच त्याला ‘बॅटलग्राउंड’ शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अशातच असिम रियाजने एका पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे. त्याच्या या पोस्टनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
याआधी असिम रियाजला ( Asim Riaz ) त्याच्या आक्रमक स्वभावामुळे ‘खतरों के खिलाडी १४’ मधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्याबरोबर तेच घडलं आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, १७ एप्रिलला असिम, रुबीना, अभिषेक यांच्यातील वाद आणखी वाढला. असिम रुबीनाचा सतत अपमान करताना दिसला. यामुळे चित्रीकरण मधेच थांबवण्यात आलं. तिघं आपापल्या व्हॅनमध्ये निघून गेले. त्यानंतर असिमला ‘बॅटलग्राउंड’ शोमधून बाहेर काढल्याचं समोर आलं आहे.
असिमला शोमधून बाहेर काढल्याचं वृत्त आल्यानंतर त्यानं एक्स अकाउंटवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये असिमनं ( Asim Riaz ) स्वतःचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिलं आहे, “स्क्रिप्टेड”. नंतर त्यानं दुसरी पोस्ट लिहिली आहे. असिमनं लिहिलं, “पेड मीडियाला कोणताही आधार नसतो, तो फक्त एक रेट कार्ड असतो. त्यांना जे सांगितलं जातं ते प्रकाशित करतात, मी जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा ठरवल्याप्रमाणे पुढे जातो. मला बाहेर काढलं आहे, म्हणून तुम्ही ओरडत राहा. पण मी स्क्रिप्टला लाथ मारली आणि खेळ पलटवला. पुढील हेडलाइन करा.”
SCRIPTED pic.twitter.com/T8Q7jXiagf
— Asim Riaz (@imrealasim) April 19, 2025
Paid media ain’t got a spine, just a rate card. They print what they’re told, I move when I decide. Keep shouting ‘kicked out’ , i kicked the script and flipped the game. Next headline? Make it count.
— Asim Riaz (@imrealasim) April 19, 2025
‘खतरों के खिलाडी’मधून असिमला बाहेर का काढलं होतं?
होस्ट रोहित शेट्टीबरोबर पंगा घेतल्यामुळे असिमला ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वातून बाहेर काढलं होतं. कारण असिमचे ( Asim Riaz ) शोमधील इतर स्पर्धंकांबरोबर वाद झाले होते. हे वाद इतके डोक्याचे झाले की रोहित शेट्टीला असिमला शोबाहेर काढण्याची वेळ आली होती. रोहितला असिमचं हे वागणं अजिबात पटलं नाही. तसंच असिमनं एका टास्कवरून देखील रोहित शेट्टीशी हुज्जत घातली होती. हा टास्क जीवघेणा असून मी करणार नाही, असा असिम म्हणत होता. पण रोहितनं त्याला हा टास्क करायला सांगितला. मात्र असिमनं काही ऐकलं नाही. तेव्हा रोहितनं त्याला सुनावलं. टास्क तज्ञांच्या देखरेखी खाली केला गेला आहे. तरीही असिम स्वतःचं म्हणण्यावर अडून राहिला. अखेर रोहित शेट्टीनं त्याला ‘खतरों के खिलाडी १४’ मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता.