‘बिग बॉस ओटीटी २’ला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये दररोज नवनवीन गोष्टी पहायला मिळत आहेत. नुकताच शोमधील स्पर्धक जैद हदीद आकांक्षा पुरीच्या लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर जैद हदीद प्रकाशझोतात आला आहे. जैद घटस्फोटीत आहे. मात्र, त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या पूर्व पत्नीचे फोटो पाहायला मिळत नाहीत. जैदने आपल्या सोशल मीडियावर पूर्व पत्नीचे फोटो अपलोड न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- आकांक्षा पुरीला सर्वांसमोर किस करणारा जैद हदीद आहे घटस्फोटित; कोण आहे त्याची पूर्व पत्नी? जाणून घ्या

‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वी जैदने इंडियन टाईम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रमोना खलीलबद्दल भाष्य केलं होतं. रमोना एक मॉ़डेल आहे. जैदने आणि रमोनाने २०१७ साली लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगीही आहे. तिचं नाव कॅटलेया आहे. मुलीच्या जन्मानंतर मतभेदांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला. पण अजूनही दोघे मिळून मुलीचा सांभाळ करतात.

हेही वाचा- सुंबूलने दुसऱ्या आईबरोबर साजरी केली ईद; तिच्या वडिलांनी लग्नानंतर पहिल्यांदाच शेअर केले पत्नीसह मुलींचे फोटो

जैद पुढे म्हणाला “मी घटस्फोटित आहे आणि मला एक मुलगी आहे. लोक माझ्या सोशल मीडियावर माझ्या मुलीचे फोटो पाहतात पण तिची आई त्यांना कधीच दिसत नाही. ते अनेकदा विचारतात की तिची आई कुठे आहे? तू तिला का लपवत आहे? पण मी तिच्या आईला लपवत नाही. आमचा घटस्फोट झाला आहे. पण मला तिच्या आईबद्दल खूप आदर आहे, ती एक सशक्त स्त्री आहे.”

हेही वाचा- ‘कौन बनेगा करोडपती १५’मध्ये होणार मोठा बदल, बिग बींनी केलं जाहीर; पाहा नवा प्रोमो

काही दिवसांपूर्वी मनीषा राणी आणि जैद हदीद यांचा एक व्हिडीओ जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये मनीषा जैदवर प्रेम व्यक्त करताना दिसली होती. एवढचं नाही तर दोघांचा किस करतानाचा व्हिडीओही समोर आला होता. त्या व्हिडीओवरुन दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- ‘CID’ फेम इन्स्पेक्टर विवेकने का घेतली मनोरंजन सृष्टीतून एग्झिट? खुलासा करत म्हणाला…

आता पुन्हा जैद आणि आकांक्षा पुरीच्या लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पर्धक अविनाश सचदेव याने जैद आणि आकांक्षाला एकमेकांना किस करण्याचा टास्क दिला होता. दोघांनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी एकमेकांना किस केलं.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss ott 2 fame jad hadid reveals why he never shares photos of his ex wife ramona khalid on social media dpj