हंसल मेहता यांची ‘स्कूप’ वेब सीरिज चांगलीच गाजली. या सीरिजचं समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं. करिश्मा तन्ना आणि झिशान अय्युब यांची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठविण्यात आली होती. तिथे या सीरिजला अवॉर्ड मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकल्प काळे ठरला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ चा विजेता, बक्षीस म्हणून मिळाले ‘इतके’ रुपये

हंसल मेहता यांच्या ‘स्कूप’ने रविवारी बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशियाई टीव्ही सीरिजचा अवॉर्ड जिंकला. त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) या अवॉर्डची बातमी शेअर केली. त्यांनी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या एका परदेशी पत्रकाराची पोस्ट शेअर करत “आम्ही जिंकलो! बुसानमध्ये ‘स्कूप’ सर्वोत्कृष्ट आशियाई टीव्ही सीरिज ठरली,” असं लिहिलं.

इतकंच नाही तर या चित्रपट महोत्सवात करिश्मा तन्नाला सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा अवॉर्डही मिळाला. करिश्माने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

‘स्कूप’ ही सीरिज २ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. ही सीरिज पत्रकार जिग्ना व्होराच्या ‘बिहाइंड बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझन’ या पुस्तकावर आधारित होती. करिश्मा तन्ना हिने जागृती पाठक नावाची भूमिका साकारली होती. यात झिशान अय्युब, प्रोसेनजीत चॅटर्जी, हरमन बावेजा यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hansal mehta scoop wins best asian tv series karishma tanna bags best lead actress award at at busan film festival hrc