‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वेब सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांची आगामी वेव सीरिज ‘हीरामंडी’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून यात सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोशल मीडियावर ‘हीरामंडी’च्या फर्स्ट लूकची जोरदार चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हीरामंडीच्या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हासह सर्व अभिनेत्री रॉयल अवतारात दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांचं नाव दिसतं. त्यानंतर मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, शर्मिन सेगहल, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि अखेरीस सोनाक्षी सिन्हाची झलक दिसते. सर्व अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या रॉयल आउटफिट्समध्ये लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा- Disney+ Hotstar Down: Ind VS Aus सामना सुरू असतानाच बंद पडली सेवा, नेटकरी संतापले

नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर पेजवरून फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “संजय लीला भन्साळी यांची आणखी एक जादूई दुनिया, एक वेगळंच युग आणि एक वेगळाच काळ ज्याचा भाग होण्यासाठी आपण वाट पाहतोय. हीरामंडीच्या या सुंदर आणि रंजक जगताची एक झलक! लवकरच तुमच्या भेटीला.” या व्हिडीओमध्ये तो काळ दाखवला आहे जेव्हा वेश्या या राण्यांप्रमाणे आयुष्य जगत असत.

आणखी वाचा- सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं लग्न OTT वर पाहता येणार? ‘या’ प्लॅटफॉर्मला हक्क विकल्याची माहिती

दरम्यान संजय लीला भन्साळी पहिल्यांदा वेब सीरिजचं दिग्दर्शक करत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ते ‘हीरामंडी’तून देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना दिसणार आहेत. मात्र ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heeramandi first look release sanjay leela bhansali upcoming web series releasing on netflix mrj