पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक अमरसिंग चमकीला व त्यांच्या पत्नी अमरजोत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अश्लील गाणी गात असल्याचे त्यांच्यावर आरोप झाले होते आणि त्याच कारणाने त्यांचा २८ व्या वर्षी खून झाला होता. अगदी अल्पावधीत लोकप्रिय झालेले चमकीला यांच्या जीवनावर आधारित ‘चमकीला’ चित्रपटात त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. १२ एप्रिल रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. त्यानंतर चमकीला एका कार्यक्रमासाठी किती मानधन घ्यायचे याबाबत चर्चा होत आहेत.

‘चमकीला’ चित्रपटात दिलजीतने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बऱ्याच ठिकाणी पैशांचा उल्लेख आहे. चमकीला अमरजोतशी लग्न केल्यावर पहिल्या पत्नीला दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याचं कबूल करतात. शिवाय इतर काही दृश्यांमध्येही चमकीलांच्या घरात पैसे ठेवलेले दिसतात. जवळपास ३६ वर्षांआधी गाण्याच्या कार्यक्रमातून अमरसिंग व अमरजोत किती कमाई करायचे, ते जाणून घेऊयात.

“मला त्यांचा खूप…”, अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…”

टीव्ही ९ च्या वृत्तानुसार अमरसिंग चमकीला त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे पंजाबी गायक होते. सुरुवातीला एका शोसाठी २०० रुपये घेणारे चमकीला नंतर एका कार्यक्रमासाठी जवळपास चार हजार रुपये घ्यायचे. चमकीला यांच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार अनेक जण लग्न ठरवायचे जेणेकरून त्यांना गायकाची तारीख मिळू शकेल. एकीकडे दुसऱ्या कलाकारांना कार्यक्रमासाठी फक्त ५०० रुपये मिळायचे तर दुसरीकडे चमकीला हजारोंमध्ये मानधन घ्यायचे.

“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…

अमरसिंग चमकीला यांच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला यावरून येईल की वर्षात ३६५ दिवस होते, पण त्यांनी एका वर्षी ३६६ शो केले होते. ते एकही दिवस रिकामे नसायचे इतके शो त्यांना मिळत होते. ते व त्यांची पत्नी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी फिरून गायनाचे कार्यक्रम करायचे. असेच एकदा चमकीला त्यांची पत्नी अमरजोतसह मेहसमपूर शहरात कार्यक्रमासाठी गेले होते, तेव्हा अचानक चेहरा झाकून पोहोचलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.