‘पंचायत ३’ ही ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक आहे. या सीरिजची क्रेझ इतकी आहे की त्याच्या पुढच्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ‘पंचायत ३’ प्रदर्शित होण्याची प्रेक्ष खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून ही सीरिज २८ मे रोजी प्रदर्शित झाली. आधीच्या दोन सीझनप्रमाणेच तिसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या शोमध्ये अभिषेक त्रिपाठी म्हणजेच सचिवजी हे मुख्य पात्र अभिनेता जितेंद्र कुमार साकारतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र कुमारने प्रॉडक्शन हाऊस टीव्हीएफशी झालेल्या वादामुळे हा शो सोडला होता, अशा चर्चा होत्या. या चर्चांवर आता त्याने मौन सोडलं आहे. “मी शो सोडला हे ऐकून लोक खूप घाबरले होते आणि ते सोशल मीडियावर त्याबद्दल बोलत होते आणि मी ते सगळं पाहत होतो. अभिषेकच्या ट्रान्सफरवर मागचा सीझन संपला होता, त्यामुळे चर्चा आणखी वाढली. हा फक्त एक गैरसमज होता झाला आणि खरं सांगायचं झाल्यास मीही ते सगळं वाचून कंटाळलो होतो. एक वेळ अशी आली की मला वाटलं अरे आता नका विचारू त्याबद्दल, थांबवा हे सगळं,” असं जितेंद्र हसत म्हणाला.

मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाचा पहिला फोटो आला समोर, दोघांनी केक कापून दिल्या पोज, पाहा PHOTO

शो सोडल्याच्या बातम्या या निव्वळ अफवा होत्या आणि मी तेव्हा ‘पंचायत’च्या नवीन सीझनची तयारी करत होतो, त्यामुळे त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही असंही जितेंद्र म्हणाला. “टीव्हीएफशी मी बऱ्याच काळापासून जोडलेला आहे, त्यामुळे असं नेमकं काय झालं की मी शो सोडला याबद्दल लोक चिंतेत दिसत होते. पण मला लक्षात आलं की हे त्यांचं प्रेम आहे आणि या सगळ्या अफवा संपवण्यासाठी आम्ही पहिल्या ट्रेलरची वाट पाहत होतो,” असं जितेंद्रने ‘इंडिया टुडे’शी बोलताना नमूद केलं.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय नीना गुप्ता, रघुबीर यादव, सानिका, फैजल मलिक व इतर कलाकार आहेत. ही सीरिज काल्पनिक फुलेरा गावात घडते. यात गावकरी व सचिव मिळून सामाजिक आणि राजकीय समस्यांना कसे तोंड देतात, ते दाखवण्यात आलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?

जितेंद्र कुमारने ‘कोटा फॅक्टरी’, ‘बॅचलर’, ‘ड्राय डे’, ‘जादुगर’, ‘चमन बहार’, ‘पंचायत’, ‘ड्राय डे’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. २०२० मध्ये जितेंद्र कुमार ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातही झळकला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला होता, पण जितेंद्रच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. जितेंद्रने गाजलेल्या वेब सीरिज केल्या असून तो ओटीटीचा सुपरस्टार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra kumar reacts on rumours of quitting panchayat after clashes with tvf hrc