रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ वेब सीरिजची अजूनही सर्वत्र चर्चा सुरू आहे. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुश्मिता सेन हिनं गौरी सावंत यांची भूमिका निभावली आहे. ‘ताली’ सीरिज प्रदर्शित होऊन आता महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्तानं सीरिजमधल्या छोट्या गौरी सावंतनं अप्रतिम एक सुंदर कलाकृती सादर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने नाना पाटेकरांची घेतली भेट, अनुभव सांगत म्हणाली, “इतका साधेपणा…”

‘ताली’ वेब सीरिजमध्ये गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची पत्नी अभिनेत्री कृतिका देव हिनं साकारली आहे. कृतिकाने ही भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. त्यामुळे तिचं चहूबाजूनं कौतुक होतं आहे. तिनं सीरिजला प्रदर्शित होऊन महिना पूर्ण झाल्यानिमित्तानं एक सुंदर कलाकृती सादर केली आहे. ‘ताली’ सीरिजमधली ‘धडके जिया’ या गाण्यावर तिनं कथ्थक नृत्य केलं आहे.

हेही वाचा – “आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”

कृतिकानं हा व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, “‘ताली’ला एक महिना पूर्ण झाला आहे. खूप दिवसांपासून मनात होतं की, ‘ताली’ मधल्या या गाण्यावर काहीतरी करावं. ते इथं सादर केलं आहे.”

हेही वाचा – स्वप्नील जोशीचा ‘या’ अभिनेत्रीबरोबर लंडनच्या ब्रीजवर रोमान्स; व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा – “अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही…”; ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या मुलीची शाळा आहे फारच खास

कृतिकाचा हा व्हिडीओ पाहून तिच्या कथ्थक नृत्याच नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “तू कथ्थक शिकली आहेस असं वाटलं पाहून…मस्तच… ” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “खूप छान.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “‘ताली’ वेब सीरिज पाहून मी तुझा चाहता झालो आहे. तू खूप छान अभिनय केला आहेस.”

हेही वाचा – “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा

दरम्यान, कृतिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच चित्रपटामध्ये काम केलं आहे. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’, ‘पानीपत’, ‘बकेट लिस्ट’, ‘प्राइम टाइम’ यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krutika deo dance performance on the occasion of one month to taali web series pps
First published on: 16-09-2023 at 11:52 IST