"मला घरातून बाहेर..." मलायकाने सांगितले अरबाज खानशी लग्न करण्याचे खरे कारण | Malaika Arora reveled reason why she marry to arbaaz khan in Moving In With Malaika nrp 97 | Loksatta

“मला घरातून बाहेर…” मलायकाने सांगितले अरबाज खानशी लग्न करण्याचे खरे कारण

मलायका आणि अरबाज १९९८ साली विवाहबंधनात अडकले होते. पण १८ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.

“मला घरातून बाहेर…” मलायकाने सांगितले अरबाज खानशी लग्न करण्याचे खरे कारण
मलायका अरोरा अरबाज खान

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. अनेकदा ती तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळे प्रसिद्धीझोतात असते. यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. फॅशनबरोबरच तिला फिटनेससाठीही ओळखले जाते. सध्या ती तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शो मुळे चर्चेत आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. यावेळी तिने अरबाजशी लग्न का केले याबद्दलही स्पष्टीकरण दिले आहे.

अभिनेत्री मलायका अरोराचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा रिअलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायकाने तिचा पूर्वाश्रमीचा पती, बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि मुलगा अरहान यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. या कार्यक्रमात तिने पहिलं लग्न आणि पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानबाबतही भाष्य केले.
आणखी वाचा : अर्जुन कपूरशी लग्न आणि आई होण्याबाबत मलायकाने सोडलं मौन; म्हणाली, “या काल्पनिक गोष्टी…”

यावेळी तिला ‘तू अरबाज खानशी लग्न का केलंस?’ असा प्रश्न फराह खानने विचारला होता. त्यावर तिने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने ‘मी अरबाज खानला लग्नासाठी प्रपोज केला होता’, असा खुलासा केला. “अरबाज खान हा एक उत्तम व्यक्ती आहे. आज त्याच्यामुळेच मी इथे आहे. मला आयुष्यात जे काही करायचं होतं, ते त्याने मला करु दिलं. माझ्या यशस्वी आयुष्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे”, असे मलायका म्हणाली.

“मी जेव्हा अरबाज खानशी लग्न केलं तेव्हा माझं वय कमी होतं. मी लहान होते. पण त्यावेळी मला घरातून बाहेर पडायचं होतं आणि म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं. विशेष म्हणजे मीच अरबाजला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. अनेकांचा यावर विश्वास नाही, पण हे खरं आहे”, असेही मलायकाने सांगितले.

आणखी वाचा : दिव्या अग्रवालच्या मराठमोळ्या बॉयफ्रेंडने दिलेल्या अंगठीने वेधलं सर्वांचेच लक्ष, अंगठीवर लिहिलंय…

दरम्यान मलायका आणि अरबाज १९९८ साली विवाहबंधनात अडकले होते. पण, १८ वर्षांनंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. सध्या मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 10:33 IST
Next Story
‘कांतारा’ हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहायला मिळणार? चाहत्यांच्या प्रश्नाला खुद्द रिषभ शेट्टीने दिलं उत्तर