सुप्रसिद्ध तमिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या कादंबरीचे चाहते जगभरामध्ये आहेत. या कलाकृतीचे अनुवाद अनेक भाषांमध्ये करण्यात आले आहेत. या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम एमजीआर यांनी केला होता. त्यानंतर मणी रत्नम यांनी कमल हासन यांना मध्यवर्ती भूमिकेमध्ये ठेवून चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली. पण त्या कलाकृतीच्या व्याप्तीमुळे आणि बजेट नसल्यामुळे त्यांनी काम थांबवले. सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण झाले. ३० सप्टेंबर रोजी त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटामध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, कार्थी, त्रिशा कृष्णन अशा कलाकारांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. हा बिगबजेट चित्रपट फक्त १५० दिवसांच्या कालावधीमध्ये तयार करण्यात आला आहे. ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाद्वारे मणी रत्नम यांनी दक्षिण भारतामधील चोला राजघराण्याचा वैभवशाली इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : राज ठाकरेंनी ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी असा रेकॉर्ड केला आवाज, मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यावेळी काहीजणांना चित्रपट पाहण्याची संधी मिळाली नाही. ते सर्वजण आता घरबसल्या चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. लेट्स सिनेमा या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’ हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. ज्यांना चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे शक्य झाले नाही अशा प्रेक्षकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यातील कलाकारांचे चाहते चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते.

आणखी वाचा – “माझं काम…”, ओटीटी प्लॅटफॉर्म्सने चित्रपट खरेदीसाठी दिलेल्या नकारावर नवाजुद्दीनने सोडले मौन

मणी रत्नम यांच्या या सुपरहिट चित्रपटाने आत्तापर्यंत जागतिक स्तरावर ४६४.०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रजनीकांत-अक्षय कुमार यांच्या ‘रोबोट २.०’ या चित्रपटानंतरचा हा तमिळ सिनेसृष्टीमधला दुसऱ्या क्रंमाकावरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा पुढचा भाग २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mani ratnams ps 1 will be released on this ott platform yps
First published on: 28-10-2022 at 12:51 IST