scorecardresearch

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
Salim Khan on Salman khan vivek Oberoi Fight
“जिच्यासाठी ते भांडले….”, ऐश्वर्या रायसाठी विवेक ओबेरॉय अन् सलमानच्या भांडणावर सलीम खान यांनी दिलेली प्रतिक्रिया

ऐश्वर्याने सलमान खानशी विवेक ओबेरॉयमुळे ब्रेकअप केल्याचं म्हटलं जातं.

Aishwarya Rai Bachchan hand Injury reason
ऐश्वर्या राय बच्चनच्या हाताला नेमकं झालंय तरी काय? अभिनेत्रीवर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती

ऐश्वर्या राय दुखापतग्रस्त हातासह ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ ला गेली होती. आता तिच्या जखमी हाताबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

Aishwarya Rai Cannes Look
9 Photos
ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये सहभागी झाली आहे. यातील तिचा लूक चांगलाच चर्चेत आहे.

Aaradhya Bachchan assists injured mom Aishwarya Rai
दुखापतग्रस्त ऐश्वर्या राय बच्चनची काळजी घेताना दिसली १२ वर्षांची लेक; आराध्याच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

ऐश्वर्या राय बच्चन अन् आराध्याचे Cannes 2024 मधील व्हिडीओ तुम्ही पाहिलेत का?

Aishwarya Rai Bachchan at cannes 2024
दुखापतग्रस्त हाताला प्लास्टर, सुंदर ड्रेस अन्…; Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली ऐश्वर्या राय बच्चन, ग्लॅमरस अंदाज चर्चेत

Aishwarya Rai Bachchan at cannes 2024 : ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस अंदाज

Aishwarya Rai Bachchan leaves for Cannes with Aaradhya
जखमी ऐश्वर्या राय बच्चन कान फिल्म फेस्टिव्हलसाठी रवाना; लेक आराध्याने उचलली आईची बॅग, व्हिडीओ व्हायरल

जखमी ऐश्वर्या रायचे व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Sushmita Sen and Aishwarya Rai
सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघींचा ३० वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल, चाहते म्हणाले…

सुश्मिता सेनने ब्रह्मांडसुंदरी तर ऐश्वर्या रायने विश्वसुंदरी हे किताब जिंकले आहेत. या दोघींचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Salman and Aishwarya
सलमान खानला ऐश्वर्या रायविषयी विचारण्यात आला ‘तो’ प्रश्न, सोशल मीडियावर उत्तराचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सलमान खानने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे, तो काय म्हणाला माहीत आहे का?

Aishwarya narkar shared video for trollers on trending reel song mazyashi neet bolaycha
VIDEO: ट्रोलर्ससाठी ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Maninee De on Aishwarya Rai and Sushmita Sen rivalry
ऐश्वर्या राय व सुश्मिता सेनमध्ये वैर होतं? मिस इंडियातील त्यांची सह-स्पर्धक म्हणाली, “त्या दोघीही खूप…”

सुश्मिता सेनने स्पर्धेत भाग घेण्यास सांगितलं होतं, असा खुलासा मानिनीने केला.

navya naveli talks about aaradhya bachchan
“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”

आराध्या बच्चनशी कसं बाँडिंग आहे? नव्या नवेली नंदा म्हणाली…

Navya naveli nanda asked about Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan
नव्या नवेलीला विचारण्यात आला अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायबद्दल ‘तो’ प्रश्न, श्वेताची लेक मामा-मामीबद्दल म्हणाली…

नव्या नवेलीने अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं वेगळंच उत्तर दिलं .

संबंधित बातम्या