बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा गॉडफादर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान पहिल्यांदा तेलगू चित्रपटात काम करताना दिसला आहे. भाषिक राज्यात या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं होत चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा टप्पा एका आठवड्यात पार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली नसली तरी प्रेक्षकांना हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरपाहता येणार आहे. येत्या १० नोव्हेंबरपासून हा चित्रपट नेटलफिक्सवर पाहता येणार आहे. हा एक हा राजकीय अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. ‘गॉडफादर’मध्ये चिरंजीवी व्यतिरिक्त नयनतारा, मुरली शर्मा, सुनील, सत्यदेव कांचराना या कलाकारांनी काम केले आहे.चित्रपटात इतकी मोठी स्टारकास्ट असूनदेखील चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

‘गॉडफादर’ हा चित्रपट मूळ ‘ल्युसिफर’ या मल्याळम चित्रपटाचा तेलुगू रिमेक आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं बजेट ९० कोटी रुपये एवढं होत. सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मुळे चर्चेत आहे..

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megstar chiranjeevi salman khans godfather to stream on netflix from nov 19 spg