South Thriller Film On OTT: अनेकांना नवीन रिलीज झालेले चित्रपट पाहायला आवडतात. आता तर ओटीटी प्लॅटफॉर्म्स असल्याने बॉलीवूड, दाक्षिणात्य, तसेच जगभरातील चित्रपट घरबसल्या पाहता येतात. काही चित्रपट इतके दमदार असतात की ते थिएटरमध्ये दमदार कमाई केल्यावर ओटीटीवरही ट्रेंड करतात. काही चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.
खरं तर कोणत्याही चित्रपटाची ताकद त्यातील कलाकार, कथा, पटकथा, अॅक्शन आणि गाण्यांवरून ठरते. आजकाल लोक थिएटरपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे जास्त वळले आहेत, कारण तिथे तुम्ही कुठेही आणि कधीही चित्रपट पाहू शकता. जर तुम्हाला सस्पेन्स चित्रपट आवडत असतील, तर हा दाक्षिणात्य चित्रपट नक्की पाहा.
इतकंच नाही तर या चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलचा एक जबरदस्त डोस मिळतो. त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत तो नक्की पाहू शकता. या चित्रपटाचे नाव काय, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुठे पाहता येईल, त्याचे आयएमडीबी रेटिंग, त्यातील कलाकार या सर्व गोष्टी जाणून घेऊयात.
या चित्रपटाचे नाव काय?
या चित्रपटाचे नाव आहे ‘थुडारम’. यात साऊथ सुपरस्टार मोहनलाल, प्रकाश वर्मा आणि थॉमस यांच्यासह इतर कलाकार आहेत. या चित्रपट इतका सस्पेन्स डोस आहे की तुम्ही शेवटपर्यंत तो पाहाल. तसेच त्याची कथा भावनिक आहे. त्यामुळे तुम्हाला सस्पेन्स व इमोशन्स दोन्हीही गोष्टींचा मिलाफ यात पाहायला मिळेल.
‘थुडारम’ची कथा काय आहे?
‘थुडारम’ चित्रपटाची कथा एक ड्रायव्हर व त्याच्या कारवरील प्रेमापासून सुरू होते. या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. ड्रायव्हरचं कारवर खूप प्रेम असतं. मग यात वेगळं काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ही कार चोरीला जाते. त्यानंतर जणू त्याचं आयुष्यच बदलतं. जसजशी चित्रपटाची कथा पुढे सरकते, तसतशा भूतकाळातील काही गोष्टी समोर येऊ लागतात. चित्रपटातील सस्पेन्स तर उत्तम आहेच, पण त्यातील व्हिज्युअल सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राउंड म्युझिकही खिळवून ठेवणारं आहे.
‘थुडारम’ कुठे पाहता येईल?
‘थुडारम’ हा चित्रपट ओटीटीवर आला आहे. तुम्ही घरबसल्या ‘थुडारम’ जिओहॉटस्टारवर पाहू शकता. ‘थुडारम’ला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही हा चित्रपट अद्याप पाहिला नसेल तर नक्की पाहा.