‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘लस्ट स्टोरीज २’ च्या ट्रेलरमध्ये नीना गुप्ता अभिनेता अंगद आणि मृणाल ठाकूरला सल्ला देताना दिसत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी या भूमिकेची निवड का केली? याबाबत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “असित मोदींनी जाहीर माफी मागावी” ‘तारक मेहता’ फेम जेनिफर मिस्त्रीने केली मागणी; म्हणाली, “त्यांनी माझ्यावर…”

‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये आजीची भूमिका का निवडली? याविषयी सांगताना नीना गुप्ता म्हणाल्या, “प्रत्येक आजीने आपल्या नातवंडांना सल्ला देणे गरजेचे असते. आताच्या तरुण पिढीबरोबर लैंगिक किंवा शारीरिक संबंध याबाबत उघडपणे संवाद साधणे गरजेचे आहे, म्हणूनच अशी एक वेगळी भूमिका साकारायचे मी ठरवले.”

हेही वाचा : “मूठभर पाण्यात जीव द्या” ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मण ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर भडकले; म्हणाले, “संवाद ऐकून…”

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “मी कॉलेजला जाईपर्यंत मला शारीरिक किंवा लैंगिक संबंधाविषयी फारशी माहिती नव्हती. मी १२ ते १३ वर्षांची होईपर्यंत माझ्या पालकांना स्वतंत्र बेडरूममध्ये झोपताना कधीच पाहिले नाही. शारिरीक संबंधांबाबत मला काहीही माहिती नव्हती एवढेच काय तर माझ्या आईने त्याविषयी मला कधीच सांगितले नाही किंवा मासिक पाळीविषयी सुद्धा मला केव्हाच मार्गदर्शन केले नव्हते. कॉलेजमध्ये असताना केवळ किस केल्यावर महिला गर्भवती होऊ शकतात असे मला वाटायचे.”

हेही वाचा : “बॉयफ्रेंडमधील कोणता गुण सर्वात जास्त आवडतो?” तमन्ना भाटियाने एका शब्दात दिले उत्तर; म्हणाली…

“पूर्वीच्या काळी मुलींना फक्त लग्नाआधी या सगळ्या गोष्टींबाबत माहिती दिली जायची, जेणेकरून तिला भीती वाटू नये, तेव्हाही महिलांना सांगितले जायचे की, मुलांना जन्म देणे हे तुमचे काम आहे. आजही यात फारसा बदल झालेला नाही. ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये या महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले जाईल”, असे नीना गुप्ता यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये नीना गुप्ता एका आजीच्या भूमिकेत दिसणार असून, त्या नव्या पिढीसमोर शारीरिक संबंधांबाबत खुलेपणाने चर्चा करताना दिसणार आहेत. यात लपवण्यासारखे काही नाही, असेही त्यांना समजवताना दिसणार आहेत.’लस्ट स्टोरीज २’ मध्ये अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २९ जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta on playing dadi maa in lust stories 2 says her role started conversation about physical relation sva 00