nivedita saraf to play important role in athang web series first look goes viral | Loksatta

टक्कल, पाण्याने भरलेले डोळे अन्…; निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो ठरतोय चर्चेचा विषय

निवेदिता सराफ यांनशेअर केलेला फोटो व्हायरल

टक्कल, पाण्याने भरलेले डोळे अन्…; निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो ठरतोय चर्चेचा विषय
निवेदिता सराफ यांनी फोटो शेअर केला आहे. (फोटो: निवेदिता सराफ/ इन्स्टाग्राम)

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. निवेदिता यांनी चित्रपटातून ९०चा काळ गाजवला. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘माझा छकुला’, ‘देऊळ बंद’ अशा हिट चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.

निवेदिता सराफ या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निवेदिता सराफ यांच्या डोक्यावर केस नसून डोळेही पाणावलेले दिसत आहेत. त्यांच्या या लूकची सोशल मीडियावरही बरीच चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी’मध्ये मोठा ट्विस्ट, पहिल्यादांच होणार चार वाइल्ड कार्ड एन्ट्री, ‘ते’ स्पर्धक कोण असणार?

निवेदिता सराफ ‘अथांग’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वेब सीरिजमध्ये त्या ‘आऊ’ ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. अथांगमधील त्यांच्या लूकचा हा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला “ही वेब सिरीज म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. एक खूप वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. नक्की पहा किती गुपितं, किती रहस्य…” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

हेही वाचा>> “मुलींबरोबर खेळू नका…” घटस्फोटाच्या चर्चांनंतर मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हेही वाचा>> Video: सोफ्यावर बसून अंकिता लोखंडेचा हॉट डान्स, नेटकरी म्हणतात “पवित्र रिश्ता…”

प्लॅनेट मराठीची ‘अथांग’ ही वेब सीरिज २५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये निवेदिता सराफ यांच्यासह संदीप खरे, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर हे कलाकरही दिसणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 15:25 IST
Next Story
सरदेशमुखांच्या वाड्यातील रहस्य आता उलगडणार? ‘अथांग’ वेबसीरिज प्रदर्शित