सध्या खूप जास्त ऊन पडतंय, त्यामुळे घराबाहेर पडणं जवळपास अशक्य झालं आहे. अशा परिस्थितीत लोक घरातच वेळ घालवणं पसंत करतात. या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर रंजक शो व वेब सीरिज पाहण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी यादी आणली आहे. या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झालेले वेब सीरिज व चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता आणि आनंद घेऊ शकता. ओटीटीवर दर आठवड्यात जगभरातील अनेक वेब सीरिज व चित्रपट रिलीज होत असतात, या आठवड्यात रिलीज झालेल्या कलाकृतींची नावं जाणून घ्या.
पंचायत सीझन ३
जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची भूमिका असलेली ही वेब सीरिज या आठवड्याच्या सुरुवातीलाच २८ मे रोजी ओटीटीवर आली आहे. मागील दोन सीझनप्रमाणेच या वेळीही सीरिजची कथा रंजक आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर तुम्हाला ही सीरिज पाहता येईल. या सीरिजमध्ये फुलेरा गाव, गावातील प्रधान, सचिव आणि गावचं राजकारण दाखवण्यात आलं आहे. पंचायत ३ मध्ये सचिव अभिषेक त्रिपाठी व प्रधानची लेक रिंकी या दोघांची प्रेम कहाणी फुलताना दाखवण्यात आली आहे. तसेच गावकरी मिळून आमदाराशी सन्मानाची लढाई कशा पद्धतीने लढतात, हेही या तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. पंचायत ३ ज्या रंजक वळणावर संपली आहे, त्यावरून प्रेक्षकांमध्ये या सीरिजच्या आगामी सीझनबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
देढ बीघा जमीन
प्रतिक गांधीचा ‘देढ बीघा जमीन’ जिओ सिनेमावर रिलीज झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत खुशाली कुमार मुख्य भूमिकेत आहे. एका माणसाने जमिनीवर ताबा मिळवल्यावर त्याच्या विरोधात व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्याची ही गोष्ट आहे.
IIT मधून शिकलेला जितेंद्र कुमार कसा झाला ‘पंचायत’चा सचिव? फिल्मी आहे त्याची अभिनेता होण्याची गोष्ट
एरिक
बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेली सीरिज एरिक नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. ही सीरिज आपल्या नऊ वर्षांच्या हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बाबाची गोष्ट आहे.
निर्मात्यांबरोबर भांडण अन् ‘पंचायत’ सीरिज सोडण्याबद्दल जितेंद्र कुमार म्हणाला, “एक वेळ अशी आली की…”
जिम हेन्सन आयडिया मॅन
जिम हेन्सन आयडिया मॅन एक बायोग्राफिकल ड्रामा आहे. हा जिम हेन्सनच्या जीवनावर आधारित आहे. जिम मपेट मॅन म्हणून ओळखला जात असे. हा चित्रपट तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.
द फर्स्ट ओमेन
जर तुम्हाला या वीकेंडला हॉरर चित्रपट बघायचा असेल तर द फर्स्ट ओमेन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हा चित्रपट ३० मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. जर तुम्हाला हॉरर चित्रपट पहायची आवड असेल तर हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
