‘पंचायत’ या वेब सीरिजचे शेवटचे तीन सीझन सुपरहिट झाले होते. प्रेम, मैत्री व राजकारणाने भरलेल्या या सीरिजच्या कथेने सर्वांना वेड लावले होते.
चाहते बऱ्याच दिवसांपासून ‘पंचायत ४’ ची वाट पाहत होते, जी आता संपली आहे. आनंदाची बातमी अशी आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वांत लोकप्रिय सीरिज ‘पंचायत ४’च्या चौथ्या भागाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. ‘पंचायत’च्या तिन्ही भागांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, जितेंद्र कुमार, सान्विका, दुर्गेश, सुनीता राजवार व पंकज झा स्टारर ‘पंचायत ४’ची रिलीज डेट समोर आली आहे. तुम्हाला तो कधी आणि कुठे पाहता येईल ते आम्ही तुम्हाला सांगतो.
‘पंचायत सीझन ४’ टीव्हीएफने म्हणजेच ‘द व्हायरल फिलर’ने बनवला आहे आणि या सीरिजचे हक्क त्याच्याकडे आहेत. दीपक कुमार मिश्रा व अक्षय विजयवर्गीय हे त्याचे दिग्दर्शक आहेत आणि चंदन कुमार लेखक व निर्माता आहेत.
गेल्या सीझनच्या शेवटी म्हणजेच ‘पंचायत ३’च्या शेवटी प्रधानजींना गोळी लागली होती, ते जखमी झाले होते. निवडणुकीच्या वातावरणात फुलेरामध्ये सर्वत्र तणाव होता. त्याच वेळी विकासच्या घरी आनंदाची बातमी येणार होती.
‘पंचायत ४’ ची स्टोरी काय असेल?
आता येणाऱ्या भागांमध्ये रिंकी आणि अभिषेकच्या लग्नाबद्दल आपल्याला काहीतरी पाहता येईल. त्यांचं लग्न जमेल, अशी अपेक्षा आहे. पण त्याआधी प्रधानजी आणि मंजू देवी यांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया पाहणे मनोरंजक असेल. कारण- त्यांना इतके दिवस त्यांच्या पाठीमागे काय चालले आहे याची काहीच कल्पना नाही. त्याशिवाय गावात आणखी बदल दिसून येतील.
‘पंचायत ४’ कधी आणि कुठे पाहता येईल
‘पंचायत सीझन ४’चा ट्रेलर अजून प्रदर्शित झालेला नाही. पण, एक महिन्यापूर्वी एक टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये त्याची रिलीज तारीख सांगण्यात आली होती. ही संपूर्ण आठ भागांची सीरिज तुम्हाला बुधवार, २ जुलै २०२५ रोजी प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. या सीरिजच्या टीझरमध्ये निवडणुकीच्या लढाईचा उल्लेख आहे. आता निकाल काय लागेल, हे चौथा सीझन पाहिल्यानंतरच कळेल.