बॉलीवूडमध्ये आतापर्यंत प्रेम कथांवर आधारित अनेक दर्जेदार चित्रपट आले आहेत. यापैकी काही चित्रपट तर सदाबहार आहेत, जे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. अशाच काही उत्तम चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘रांझणा’ होय. या चित्रपटाची कथा इतकी दमदार होती की पाहणारे भावुक झाले होते. सोनम कपूर, धनुष, अभय देओल यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती.
रांझणाचे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘रांझणा’ हा चित्रपट १०० कोटी कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची नर्मिती करण्यासाठी निर्मात्यांनी ५० कोटी रुपये खर्च केले होते. रांझणाने बजेटच्या दुप्पट कमाई केली होती. या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १०५ कोटी रुपये होते. त्यावेळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटी रुपयांचे कलेक्शन करणं ही खूप मोठी गोष्ट होती.
रांझणा चित्रपटाची कथा
‘रांझणा’मध्ये कुंदन व झोयाची कहाणी दाखवण्यात आली होती. कुंदन झोयाच्या प्रेमात इतका वेडा असतो की तो तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो. तर झोया कॉलेजमध्ये अभय देओलच्या प्रेमात पडते. दोघेही लग्नाच्या तयारीत असतात पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि अभय देओलचा मृत्यू होतो. शेवटी कुंदनचाही मृत्यू होतो.
या चित्रपटात सोनम कपूर, धनुष, अभय देओल व इतर सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. लोक अजूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रांझणा चित्रपट पाहतात. या सिनेमातील संवाद व गाण्यांची क्रेझ आताही लोकांमध्ये पाहायला मिळते. तुम्ही ‘रांझणा’ चित्रपट पाहिला नसेल तर तो ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 आणि अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे. आनंद एल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तुम्ही घर बसल्या पाहू शकता.