यावर्षी अनेक बॉलीवूड चित्रपटांचे सीक्वेल आले. यामध्ये मेट्रो इन दिनों, धडक २, सितारे जमीन पर, सन ऑफ सरदार २ या चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी सितारे जमीन पर वगळता इतर तिन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करता आलेली नाही. सन ऑफ सरदार २ तर बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. तो आता ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.

अजय देवगणचा विनोदी चित्रपट ‘सन ऑफ सरदार 2’ १ ऑगस्ट रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. सन ऑफ सरदार २ हा २०१२ मधील हिट चित्रपट सन ऑफ सरदारचा सीक्वेल आहे. यामध्ये अजय देवगण व मृणाल ठाकूरने मुख्य भूमिका केल्या.

सन ऑफ सरदार २ मध्ये रवी किशन, संजय मिश्रा, नीरू बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोबरियाल, विंदू दारा सिंह, रोशनी वालिया, शरत सक्सेना, साहिल मेहता व दिवंगत मुकुल देव या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता तो घरबसल्या पाहू शकता.

‘सन ऑफ सरदार 2’ कुठे पाहायचा?

‘सन ऑफ सरदार 2’ चे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केलं आहे. सिनेमागृहांमध्ये रिलीज झाल्यावर आठ आठवड्यांनी हा चित्रपट आज २६ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे.

‘सन ऑफ सरदार २’ ची कथा

‘सन ऑफ सरदार २’ मध्ये जस्सीची (अजय देवगण) कथा दाखवण्यात आली आहे. जो त्याच्या पत्नीबरोबरचं नातं सुधारण्यासाठी स्कॉटलंडला जातो, पण तिथे तो जमावाच्या भांडणात आणि शीख लग्नातील गोंधळात अडकतो. तिथे अपहरणकर्त्यांना सोडवण्याचा आणि त्याचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न करताना विचित्र परिस्थितीत अडकतो.

हेही वाचा

‘सन ऑफ सरदार 2’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

‘सन ऑफ सरदार २’ कडून खूप अपेक्षा होत्या, पण दिग्गज कलाकारांची मांदियाळी असूनही सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नाही. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, चित्रपटाने भारतात ४६.८२ कोटी रुपये कमावले, तर जगभरात ६५.७५ कोटींचे कलेक्शन केले होते.

दरम्यान, ‘सन ऑफ सरदार 2’ पहिला भआग २०१२ मध्ये रिलीज झाला होता. यात सोनाक्षी सिन्हा, जूही चावला व संजय दत्त हे कलाकार होते.