Squid Game 2 Release Date : लोकप्रिय कोरियन वेब सीरिज ‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तीन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘स्क्विड गेम’ सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. तसंच या थ्रीलर वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला होता. पहिल्या सीझनमध्ये ९ भाग होते. आता पहिल्या सीझनला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून शेवटचा सीझन देखील कधी प्रदर्शित होणार, हे देखील समोर आलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात ‘स्क्विड गेम’च्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा करत ली जुंग-जेचा ( Lee Jung Jae ) लूक प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता सहा महिन्यांनी दुसऱ्या सीझनच्या प्रदर्शनेच्या तारखेची घोषणा केली आहे. आज सकाळीच ‘स्क्विड गेम’च्या चाहत्यांना खास सरप्राइज देण्यात आलं आहे.

हेही वाचा – Video: अमेरिकेहून सुट्टी एन्जॉय करून लाडक्या लेकीसह मुंबईत परतील ऐश्वर्या राय-बच्चन, नेटकरी म्हणाले, “ही शाळेत जात नाही का?”

नेटफ्लिक्सने एक धमाकेदार ‘स्क्विड गेम २’चा ( Squid Game 2 ) टीझर प्रदर्शित करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यंदा २६ डिसेंबरला ‘स्क्विड गेम २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर अंतिम सीझन २०२५मध्ये प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या ‘स्क्विड गेम २’च्या टीझरमधून या तारखा जाहीर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पण तिसऱ्या सीझननंतर ‘स्क्विड गेम’चा प्रवास थांबणार आहे.

स्क्विड गेम २चा टीझर पाहा

हेही वाचा – अनंत अंबानींच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेला मराठी अभिनेता झळकणार आता लोकप्रिय मालिकेत, म्हणाला, “खूप दिवसांनी पुन्हा…”

दरम्यान, ‘स्क्विड गेम’ वेब सीरिजचा पहिला सीझन आणण्यासाठी १२ वर्षे लागली होती. पण सीरिज नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका बनण्यासाठी फक्त १२ दिवस लागले होते. प्रदर्शित होताच अनेक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘स्क्विड गेम’ सीरिज ट्रेंड करत होती. त्यामुळेच दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर २६ डिसेंबरपासून ‘स्क्विड गेम २’ ( Squid Game 2 ) वेब सीरिज सर्वत्र पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे आता ‘स्क्विड गेम’च्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.