Trending Movies on Netflix : करोनाच्या साथीनंतर ओटीटीचा ट्रेंड खूप वाढला आहे. आजकाल लोक थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहतात. नेटफ्लिक्स सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे.
जगभरातील अनेक सुपरहिट चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात.
रोमँटिक ड्रामापासून ते क्राइम, थ्रिलर तसेच हॉरर, असे प्रत्येक जॉनरचे चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. दर आठवड्याला नेटफ्लिक्सवर नवनवीन कलाकृती रिलीज होत असतात. आज भारतात ट्रेंडिंग असलेल्या ५ चित्रपटांची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
द डिप्लोमॅट
The Diplomat on Netflix: जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रदर्शित झाला आणि नंतर ९ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला. हा चित्रपट भारत व पाकिस्तानमधील संबंधांवर आधारित आहे. चित्रपटाची कथा २०१७ मध्ये पाकिस्तानहून भारतात परतलेल्या उज्मा अहमदच्या सत्यकथेपासून प्रेरित आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि सध्या तो नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
गुड बॅड अग्ली
Good Bad Ugly हा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे. हा अॅक्शन-कॉमेडी तमिळ चित्रपट आहे. यात तमिळ सुपरस्टार अजित कुमार मुख्य भूमिकेत आहे. एका रिटायर्ड गँगस्टरवर आधारित हा चित्रपट आहे. त्याचा मुलगा खोट्या प्रकरणात अडकल्यावर तो हिंसाचार करतो. हा २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट आहे. तो नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमाकंकावर ट्रेंड करतोय.
जॅक
नेटफ्लिक्सवर तेलुगू चित्रपट ‘जॅक’ देखील ट्रेंडिंग आहे. हा एक स्पाय अॅक्शन ड्रामा आहे जो नेटफ्लिक्सवर खूप पाहिला जात आहे. या चित्रपटात सिद्धू जोन्नलगड्डा, वैष्णवी चैतन्य आणि प्रकाश राज यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी तो नेटफ्लिक्सवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
सिकंदर
‘सिकंदर’ चित्रपट नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत आहे. सलमान खानचा हा चित्रपट ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. सध्या ‘सिकंदर’ नेटफ्लिक्सवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
मिशन इम्पॉसिबल – The Final Reckoning
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत असतील आणि या यादीत हॉलीवूडचा एकही चित्रपट नसेल, असं कसं शक्य आहे. मिशन: इम्पॉसिबल – The Final Reckoning हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.