Valentine Week OTT Release : फेब्रुवारीचा पहिला आठवडा चित्रपट आणि वेब सीरिजच्या रसिकांसाठी खूप खास राहिला. अनेक नवीन कलाकृती ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्या. आता फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. हा दुसरा आठवडा म्हणजे व्हॅलेंटाईन वीक आहे. या आठवड्यात अनेक रंजक कलाकृती तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. थ्रिलर, क्राईम, रोमान्स आणि ॲक्शनने भरलेले अनेक चित्रपट आणि सीरिज या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही व्हॅलेंटाइन डेला किंवा वीकेंडला या कलाकृती घरी बसून पाहू शकता. या वीकेंडला कोणते चित्रपट व सीरिज रिलीज होत आहेत, त्याची यादी जाणून घेऊयात.

बॉबी और ऋषि की लव स्टोरी

Bobby Aur Rishi Ki Love Story : ‘बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी’ हा एक रोमँटिक चित्रपट आहे. यातून अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीची लेक कावेरी कपूर इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट डिस्ने+हॉटस्टारवर ११ फेब्रुवारीपासून पाहता येईल.

धूम धाम

Dhoom Dhaam on Netflix : यामी गौतम आणि प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिका असलेला आगामी चित्रपट ‘धूम धाम’ १४ फेब्रुवारीपासून घरबसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन्स डेला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ‘धूम धाम’ मध्ये कोयल आणि वीर या नवविवाहित जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. यात प्रतीक बब्बर व एजाज खान यांच्याही भूमिका आहेत.

मार्को

Marco on Sony Liv : ‘मार्को’ हा मल्याळम चित्रपट आहे, ज्यामध्ये उन्नी मुकुंदनने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर प्रेक्षकांना यात एका गँगस्टरची कथा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

प्यार टेस्टिंग

Pyaar Testing on OTT : ‘प्यार टेस्टिंग’ ही एक वेब सीरिज आहे, जी तुम्हाला झी 5 वर व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच १४ फेब्रुवारीला पाहता येईल. या रोमँटिक कॉमेडी सीरिजमध्ये सत्यजित दुबे आणि प्लाबिता बोरठाकूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

काधलिक्का नेरामिल्लई

Kadhalikka Neramillai on OTT : रवी मोहन आणि नित्या मेनन स्टारर चित्रपट काधलिक्का नेरामिल्लई देखील या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट तुम्हाला मंगळवार (११ फेब्रुवारीपासून) नेटफ्लिक्सवर पाहता येईल. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्याला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine week ott release bobby aur rishi ki love story dhoom dhaam on netflix marco on sony liv pyaar testing kadhalikka neramillai on ott hrc