‘विश्वरुपम २’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. ‘विश्वरुपम’च्या पहिल्या भागात ओमर कुरेशीची भूमिका करणा-या राहुल बोसने ‘विश्वरुपम २’ च्या चित्रीकरणासाठी चेन्नईला रवाना झाल्याचे टि्वीट केले आहे. तसेच, चित्रपटात कमल हसन, पूजा कुमार आणि अॅन्ड्रीआ जेरेमिया हे देखील त्यांच्या भूमिका करणार आहेत.
‘विश्वरुपम २’ हा गुप्तहेर रोमांचकारी चित्रपट असून तो तामिल आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. कमल हसनने चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले असून तो सहनिर्मातादेखील आहे. सदर चित्रपटाचे ४० टक्के चित्रीकरण पहिल्या भागाच्यावेळीच झाले असल्याचे कमल हसनने सांगितले. यावेळेस एम घिब्रनऐवजी शंकर-एहसान-लॉय संगीत दिग्दर्शन करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul bose starts shooting for kamal haasans vishwaroopam