‘राजा हिंदुस्तानी’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरस्त गाणी, अफलातून अभिनय आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला होता. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज तब्बल २४ वर्ष पुर्ण झाली आहे. आमिर खान आणि करिश्मा कपूरच्या एका किसिंग सीनमुळे ‘राजा हिंदुस्तानी’ त्यावेळी वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. हा सीन आजही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या किंसिंग सीन पैकी एक म्हणून ओळखला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटमुळे चाहते आवाक्

२४ वर्षानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत या किसिंग सीन मागचा एक चकित करणारा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “भारतीय सिनेसृष्टीत तो पर्यंत इतका मोठा किसिंग सीन चित्रीत झाला नव्हता. त्यामुळे पडद्यावर जेव्हा हा सीन प्रेक्षक पाहतील तेव्हा त्यांची काय प्रतिक्रीया असेल याबाबत आमच्या मनात शंका होती. हा सीन आम्ही जवळपास तीन मिनिट शूट केला होता. आम्हाला वाटलं होतं सेंन्सर बोर्ड या सीनला काढून टाकण्याचा आदेश देईल. पण त्यांनी संपूर्ण सीन ठेवण्यास होकार दिला. शेवटी आमच्या एडिटिंग टीमने निर्णय घेऊन त्या सीनमधील २ मिनिट ४० सेकंद आम्ही कट केली अन् केवळ २० सेकंदांचं किसिंग आम्ही दाखवलं. आज किसिंग सीन पाहताना काही आश्चर्य वाटत नाही पण त्याकाळी अनेक प्रेक्षक केवळ तो सीन पाहण्यासाठी दोन दोन – तीन तीन वेळा चित्रपट पाहात होते असे किस्से आम्ही ऐकले आहेत.”

अवश्य पाहा – फटाक्यांच्या पॅकेट्सवर परिणीतीचे फोटो; ‘इकोफ्रेंडली दिवाळी’ म्हणणारी अभिनेत्री होतेय ट्रोल

‘राजा हिंदुस्तानी’ हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक कलाकार झळकले होते. धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. २४ वर्षांपूर्वी या चित्रपटाने तब्बल ३०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raja hindustani aamir khan karisma kapoor kissing scene mppg