अभिनेता रजनीकांतच्या बहुचर्चित ‘कौचदैयान’ चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. इरॉस इंटरनॅशनल मिडीया एन्टरटन्मेंटची निर्मिती असलेला ‘कौचादैयान’चे दिग्दर्शन रजनीकांतची कन्या सौदर्यां रजनीकांत अश्विनने केले आहे. यापूर्वी ९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही तारीख बदलून २३ मे करण्यात आल्याची अधिकृत घोषणा गुरूवारी करण्यात आली. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘फोटोरिअलास्टिक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक जण ‘कौचादैयान’ बघण्यासाठी उत्सुक आहेत.  ‘कौचादैयान’मध्ये रजनीकांतच्या जोडीला दीपिका पदुकोण, आर. शरथ कुमार यांच्यासुद्धा प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट सहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच जगभरात ६,००० ठिकाणी प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांना टू-डी आण थ्री-डी या दोन्ही तंत्रांच्या सहायाने बघता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanths kochadaiiyaan postponed again will now release on may