राखी सावंत ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती ऍक्टिव्ह असते. तिने बऱ्याचदा आपल्या नवऱ्याचा उल्लेख केला असला तरी त्याच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. त्यामुळे तिचा नवरा कोण हे एक रहस्य आहे. पण लवकरच हे रहस्य उलगडणार असल्याचं समोर येत आहे.
राखी तिच्या नवऱ्यासोबत एका रिऍलिटी शोमध्ये दिसणार असल्याचं कळत आहे. राखीने सांगितलं की, तिला आणि तिच्या नवऱ्याला रिऍलिटी शोजमध्ये एकत्र सहभागी होण्यासाठी अनेक ऑफर्स येत आहेत. एका डान्स रिऍलिटी शोचे निर्माते रितेशच्या संपर्कात असल्याचं राखीने सांगितलं. मात्र तिने कुठल्याही शोचं नाव घेतलं नाही.
एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी फार काही सांगणार नाही पण आम्हाला दोघांना एका मोठ्या रिऍलिटी शोकडून निमंत्रण आलं आहे. पण मी त्या शोचं नाव सांगणार नाही.” हा शो नच बलिये आहे का असं विचारलं असता ती म्हणाली, “नो कमेंट्स. मला याबद्दल फार काही बोलायचं नाही. या सगळ्यांसंदर्भात चर्चा बोलणी सुरु आहेत. रितेश मोठा व्यावसायिक असल्यानं निर्माते त्याच्याशी बोलत आहे. मला आधी वाटलं होतं की त्याच्या हाताखाली ४०० लोक काम करत असतील पण मला काही दिवसांपूर्वीच कळलं की तो १०,००० कर्मचाऱ्यांना सांभाळत आहे. जर तो या शोसाठी भारतात आला तर त्याला ३ ते ४ महिन्यांसाठी त्याचं काम सोडून इकडे राहावं लागेल. “
“गोंडस ते ग्लॅमरस”…राखी सावंतचे ‘हे’ फोटो पाहिले का?
“रितेशचा भारतात येण्याचा विचार चालला असून त्याला त्याच्या पहिल्या लग्नाबद्दलचे सर्व गैरसमज दूर करायचे आहेत”, असंही ती म्हणाली.
राखी सध्या तिची आई जया हिची काळजी घेण्यात व्यस्त आहे. राखीची आई कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहे. राखी बिगबॉस १४ च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र तिने १४ लाख रुपये घेऊन स्पर्धेतून माघार घेतली. आपल्या आईच्या उपचारांसाठी हे पैसे वापरणार असल्याचं तिने सांगितलं.