राखी सावंत विविध कारणांमुळे कायमच चर्चेत असते. बिग बॉसच्या १४ व्या पर्वात तर राखीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. वादग्रस्त वक्तव्यांसोबतच विविध करामती करून राखीने बिग बॉसच्या घरात सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. खास करून राखीने या पर्वात अभिनव शुक्लचा पिच्छा सोडला नाही. अभिनव शुक्लाच्या प्रेमात पडलेल्या राखीने अभिनवचं लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राखी हे सगळं फक्त शोसाठी करत असल्याची सगळ्यांची समजूत झाली.
मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीने एक मोठा खुलासा केला आहे. खोट्या प्रेमाचा दिखावा करताना आपल्याला अभिनव खरचं आवडू लागला होता असं ती म्हणाली.
बिग बॉसच्या शोमध्ये अभिनव फारसा उठून दिसत नव्हता. त्याच्याकडे बोअरिंग म्हणून पाहू लागले होते. यासाठी रुबीनाशी बोलून आपण त्याच्याशी खोट्या प्रेमाचं नाटक करणार असल्याचं राखी म्हणाली. लोकांसमोर अभिनवला वेगळ्या रुपात आणण्यासाठी हा ड्रामा करण्याचं ठरलं होतं असंही ती म्हणाली. यासाठीच राखीने अभिनवसोबत खोट्या प्रेमाचं नाटक करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
रेडिओ होस्ट सिद्धार्थ केननला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, “मी तर फक्त मनोरंजन करत होते आणि हा तिच्या नवऱ्यासोबत माझं खोटं अफेअर सुरू होतं. पण हा मी खोटं बोलणार नाही. तो खूप चांगला व्यक्ती आहे. थोडीशी ओढ माणसाला निर्माण होते. प्राण्याव जीव बसतो तो तर एक जीवंत माणूस आहे. तो खूप चांगला आहे. बायकोची काळजी करतो आणि प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे.” असं राखी म्हणाली.
बिग बॉसच्या घरात राखी आणि अभिनवच्या खोट्या लव्हस्टोरीने काही काळ मनोरंजन झालं असलं. तरी नंतर मात्र या अभिनवला राखीचा राग येऊ लागला होता. राखीने मर्यादेत रहावं अशी ताकिदच अभिनव आणि रुबीनाने तिला दिली होती.