बॉलीवूड चित्रपटसृष्टीत सर्वात मोठे योगदान असलेले कुटुंब म्हणजे कपूर खानदान. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून कपूर कुटुंबाच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांची ही धुरा आता त्यांचा नातू रणबीर कपूर सांभाळत असतानाच त्याने त्याचे आजोबा आणि दिग्गज कलाकार राज कपूर यांच्यावर लघुपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अभिनेता रणबीर कपूरला लघुपट बनविण्यासाठी त्याचे आजोबा आणि दिग्गज कलाकार राज कपूर यांचे आयुष्य फार मनोरंजक वाटते. ‘शुरुआत का इंटरवल’ या लघुचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला रणबीर कपूर उपस्थित होता. त्यावेळी त्याने आपली इच्छा व्यक्त केली. त्याला कोणावर लघुपट बनवायला आवडेल असे विचारले असता तो म्हणाला, मला माझ्या आजोबांवर लघुपट बनवायला आवडेल. त्यांचे जीवन हे मनोरंजक आणि मजेदार होते.

 ‘श्री ४२०’, ‘मेरा नाम जोकर’, ‘अनारी’ आणि ‘बरसात’ या चित्रपटांमुळे आजही राज कपूर प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor wants to make short film on grandfather raj kapoors life