अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. आता रिया चक्रवर्ती हिने  सुशातची बहीण प्रियंका सिंह, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. तरूण कुमार आणि अन्य जणांविरोधात मुंबई पोलिसात बनावट कागदपत्रं प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

रियाने मुंबई पोलीसात फसवेगिरी, एनडीपीएस अॅक्ट आणि टेली मेडिसीन प्रॅक्टिस गाइडलाईन २०२० च्या आरोपांतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. रियाचे वकील सतीश मनेशिंदे यांचे म्हणने आहे की, ८ जून रोजी सुशांतला त्याची बहिणी प्रियंकाने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरूण कुमार यांच्याकडून बनावट प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्या औषधांची नावं होती, जी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत येतात आणि त्यांची बंदी आहे.

आणखी वाचा- रियाने एनसीबीच्या चौकशीदरम्यान उघड केली बॉलिवूडमधली मोठी नावं

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी निगडीत असलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची आज मागील सहा तासांपासून एनसीबीकडून चौकशी सुरू आहे.

या चौकशीदरम्यान रियाने बॉलिवूडमधल्या काही बड्या कलाकारांची नावं एनसीबीसमोर उघड केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही कोणकोणती नावं आहेत आणि कशासंदर्भात तिने ती नावं सांगितली, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये अमली पदार्थांची चव कधीच चाखलेली नाही, असा दावा केला होता. २८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले.