रॉबर्ट डी निरो हे हॉलिवूडमधील एक प्रथितयश अभिनेते आहेत. जगभरात तर त्यांचे लाखो चाहते आहेतच, पण भारतातही त्यांना फॉलो करणारे बरेच लोक आहेत. हॉलिवूडमधील एक ताकदीचा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. रॉबर्ट डी निरो हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मध्यंतरी वयाच्या ७९ व्या वर्षी सातव्यांदा बाप झाल्याने ते चर्चेत आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता नुकतेच एका वेगळ्याच कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. रॉबर्ट डी निरो यांच्या असिस्टंटने त्यांच्यावर फार भयंकर आरोप केल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. २००८ ते २०१९ या कार्य काळात रॉबर्ट यांच्या कंपनीत म्हणजेच कॅनल प्रॉडक्शनमध्ये काम करणाऱ्या ४१ वर्षीय ग्रॅहमने ८० वर्षीय डी निरो यांच्यावर लैंगिक भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर भाईजानच्या ‘टायगर ३’ला टक्कर देणार दोन बहुचर्चित मराठी चित्रपट; कोणता चित्रपट मारणार बाजी?

रॉबर्ट यांचे वर्तणूक चांगली नसल्याने आणि त्यामुळे तिला फारच अवघडल्यासारखं वाटल्याचं ग्रॅहमने सांगितलं आहे. ग्रॅहमच्या म्हणण्यानुसार, “ते सतत मला स्वतःची पाठ खाजवण्यास सांगायचे, तिथे पाठ खाजवण्यासाठी एक यंत्रदेखील असायचे तरी रॉबर्ट यांनी कधीच त्याचा वापर केला नाही.” ज्यावेळी ग्रॅहमने याबद्दल तक्रार केली तेव्हा रॉबर्ट म्हणायचे, “तू ज्या पद्धतीने करतेस तेच फार बरं वाटतं. रॉबर्ट यांच्या या कृत्याला ग्रॅहम यांनी अश्लील म्हणत त्यांच्यावर आता गंभीर आरोप केले आहेत. शिवाय रॉबर्ट डी निरो यांनी ग्रॅहमला बऱ्याचदा शिवीगाळ केल्याचंही तिने यात नमूद केलं आहे.

यावर प्रत्युत्तर देताना रॉबर्ट यांनी सांगितल्यानुसार त्यांनी केवळ एखाद-दुसऱ्यांदाच ग्रॅहमला पाठ खाजवण्यास सांगितले आहे, आणि त्यात रॉबर्ट यांचा समोरच्या व्यक्तीचा अनादर करायचा हेतू अजिबात नसल्याचंही अभिनेत्याने कबूल केलं आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा रॉबर्ट यांनी कंपनीच्या खात्यांचा गैरवापर केल्याबद्दल तिच्यावर खटला दाखल केला होता, तेव्हाच ग्रॅहमने १२ दशलक्ष डॉलर्सचा हा खटला दाखल केला होता. रॉबर्ट यांची गर्लफ्रेंड टिफनी चेन हिनेसुद्धा ग्रॅहम मानसिक रुग्ण असल्याचं स्पष्ट करत रॉबर्ट डी निरो यांच्यावरील सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robert de niro former top assistant says she found his back scratching behavior creepy avn