सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, जिम करताना आला हृदयविकाराचा झटका | Salman Khan Body Double Sagar Pandey Death Due To Heart Attack nrp 97 | Loksatta

सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, जीममध्ये व्यायाम करताना आला हृदयविकाराचा झटका

त्याने दबंग, दबंग २, बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाइट यासारख्या चित्रपटात काम केले होते.

सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, जीममध्ये व्यायाम करताना आला हृदयविकाराचा झटका

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक बातम्या येत आहे. बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल असलेल्या सागर पांडेचं निधन झालं आहे. सागर जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो ५० वर्षांचा होता. या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर पांडे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असायचा. तो प्रचंड लोकप्रिय होता. त्याचे अनेक चाहते होते. तो सलमान खानची कार्बन कॉपी म्हणून ओळखला जायचा. सागर हा जिममध्ये वर्कआऊट करताना त्याच्या छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना जोगेश्वरीमधील बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आणखी वाचा : “मी तुमच्या मुलावर….” सासूबाईंच्या निधनानंतर नम्रता शिरोडकरची भावूक पोस्ट

यानंतर बॉलिवूडसह अनेक कलाकारांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अनेकांना हे वृत्त ऐकून धक्का बसला. भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेने याबद्दल पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले.

आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन

सागर पांडे हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो सलमान खानप्रमाणे अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. अनेक वर्षे संघर्ष करुनही त्याला सिनेसृष्टीत काम मिळाले नाही. त्यानंतर त्याने बॉडी डबल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो सलमान खानचा फार मोठा चाहता होता. विशेष म्हणजे त्याच्याप्रमाणे तो बॅचलर होता.

सागरने १९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून बॉडी डबल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने दबंग, दबंग २, बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाइट यासारख्या जवळपास ५० चित्रपटात बॉडी डबल म्हणून काम केले आहे. लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता, असे त्याने गेल्यावर्षी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हृतिकचा ‘विक्रम वेधा’ पाहिल्यावर गर्लफ्रेंड आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या…

संबंधित बातम्या

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
“दोन दिवस मी पुण्यात…” अचानक लाइव्ह येण्यामागे संकर्षण कऱ्हाडेने दिलं कारण
“मी ५ लाख घेतले पण…” फसवणुकीच्या आरोपावर अभिनेते सयाजी शिंदेंनी सोडलं मौन
मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘हा’ लोकप्रिय भारतीय अभिनेता एलॉन मस्कच्या सहाय्याने घेणार अंतराळात झेप
सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
“आता तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आणि कुठून कुठून जाणार, हे तुम्हाला तरी कळतं का?” – उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला!
मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले
पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने मित्राची दहा लाखांची फसवणूक