सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. दरम्यान बॉलिवूडचा दबंग खान सलमान त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांची मने जिंकत असतो. आता देखील सलमानने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान प्रभूदेवासह नाचताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान सुदीप, निर्माता साजिद नाडियाडवाला आणि प्रभू देवा ‘उर्वशी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सलमानचा डान्स आणि त्या तिघांचे हावभाव पाहून चेहऱ्यावर हास्यच उमटते. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसह सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार असून अरबाज खान आणि दाक्षिणात्य अभिनेता सुदीप देखील झळकणार आहेत. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र सलमाननं याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.

सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सलमान व कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. सलमानचे ‘ट्यूबलाइट’, ‘रेस ३’ हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे ‘भारत’च्या यशाने त्याला दिलासा मिळाला आहे. ‘दबंग 3’ कडूनदेखील सलमानला खूप आशा आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan dance on prabhu deva song urvashi avb