मी अजूनही ५५० रूपयांचा टी-शर्ट आणि १५ वर्षांपूर्वीची जुनी जीन्सपँट वापरतो. मी वापरत असलेले बुटही २० वर्षांपूर्वीचे आहेत, असे उद्गार बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने काढले आहेत. मी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे लोक मला स्टार मानतात. मात्र, मी स्वत: या स्टारपणाच्या गोष्टी फार गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी कधीही स्टारसारखा वागत नाही. फक्त लोक माझ्याकडे त्या नजरेतून बघतात, असे सलमानने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. एरवीही विविध कारणांमुळे सतत चर्चेत असणारा बॉलीवूडचा भाईजान पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. गेल्या काही काळात हिट अँड रन आणि अन्य प्रकरणांमुळे सलमानची प्रतिमा डागाळली होती. या सगळ्यावरून त्याच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. त्यामुळे गेल्या काही काळात सलमान जाणीवपूर्वक त्याची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सलमान म्हणाला की, मी सगळ्यांचीच टीका गांभीर्याने घेत नाही. माझ्या एखाद्या जवळच्या किंवा मला जाणणाऱ्या एखाद्या व्यक्तीने अशी टीका केली असेल तरच मी त्याकडे लक्ष देतो. लोक सुरूवातीला माझ्यावर टीका करतात, पण काही काळानंतर त्यांना कळते की, ते चुकीचे होते, असे सलमानने मुलाखतीदरम्यान म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2015 रोजी प्रकाशित
मी अजूनही ५५० रूपयांचे टी-शर्ट आणि १५ वर्षांपूर्वीची जीन्स वापरतो- सलमान खान
मी अजूनही ५५० रूपयांचा टी-शर्ट आणि १५ वर्षांपूर्वीची जुनी जीन्सपँट वापरतो.
Written by रोहित धामणस्कर

First published on: 08-09-2015 at 12:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan i dont behave like a star