तिकीट पाठवा, सलमानचा ऑटोग्राफ मिळवा!, ही काही नवी स्किम वगैरे नाही. तर सलमानची निर्मिती असलेल्या हिरो या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी लढवण्यात आलेली शक्कल होती.
बॉलिवू़ड अभिनेता सलमान खानने चाहत्याने पाठवलेल्या ‘हीरो’च्या तिकिटावर ऑटोग्राफ दिला आहे. त्याने हे तिकिट मायक्रोब्लॉगिंग साइट टि्वटरवर शेअर केले आहे. त्याचसोबत सलमानने हेही ट्विट केले की, ‘काही चाहत्यांनी पाठवलेल्या तिकीटावर मी ऑटोग्राफ केले आहेत. अशीच तिकीटे पाठवत राहा, मी ऑटोग्राफ देईन. टॅग करायला विसरू नका #HeroKaTicket.’ निखिल आडवाणी दिग्दर्शित या सिनेमातून आदित्य पांचोलीचा मुलगी सूरज पांचोली आणि सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ११ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिकीटबारीवर काही फारशी कमाई केलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan signature on hero movie ticket